'मैंने प्यार किया' पुन्हा एकदा थिएटरमध्ये होणार रिलीज! 35 वर्षांनंतर पुन्हा सलमानची जादू अनुभवण्याची संधी

Salman Khan And Bhagyashree Maine Pyaar Kiya Rerelease : सलमान खान आणि भाग्यश्रीची जादू पुन्हा एकदा अनुभवता येणार...

दिक्षा पाटील | Updated: Aug 18, 2024, 03:43 PM IST
'मैंने प्यार किया' पुन्हा एकदा थिएटरमध्ये होणार रिलीज! 35 वर्षांनंतर पुन्हा सलमानची जादू अनुभवण्याची संधी title=
(Photo Credit : Social Media)

Salman Khan And Bhagyashree Maine Pyaar Kiya Rerelease : बॉलिवूडचा भाईजान सलमान खान सूरज बडजात्याचा 'मैंने प्यार किया' या चित्रपटाची अजूनही प्रेक्षकांमध्ये क्रेझ आहे. 1980 मध्ये प्रदर्शित झालेल्या याच चित्रपटातून सलमान खाननं त्याच्या करिअरला सुरुवात केली होती. या चित्रपटात त्याच्यासोबत भाग्यश्री त्याच्यासोबत दिसली. आता तीन दशकांनंतर हा चित्रपट पुन्हा एकदा प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी घोषणा केली की पुन्हा एकदा हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 35 वर्षांनंतर हा चित्रपट पुन्हा एकदा थिएटर्समध्ये प्रदर्शित होणार आहे. 

निर्मात्यांनी ही घोषणा करत पोस्ट सांगितलं की हे त्यांची मैत्री पुन्हा एकदा अनुभवण्याची वेळ आली कारण मैंने प्यार किया 23 ऑगस्ट 2024 ला पुन्हा एकदा प्रदर्शित होणार आहे. 'मैंने प्यार किया' मध्ये सुमनची भूमिका साकारणारी भाग्यश्रीनं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर या घोषणेची बातमी रीपोस्ट केली. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

दरम्यान, जेव्हा भाग्यश्रीनं या चित्रपटात काम केलं तेव्हा ती 18 वर्षांची होती. त्याविषयी देखील एका मुलाखतीत भाग्यश्रीनं सांगितलं की तेव्हा ती 18 वर्षांची होती आणि ती रिलेशनशिपमध्ये होती. तर लवकरच ती लग्न बंधनात अडकणार होती. भाग्यश्रीनं हे देखील सांगितलं की लग्नाच्या आधी तिनं कधीच कोणत्या मुलाला मिठी मारली नव्हती. त्यावेळी भाग्यश्रीनं चित्रपटासंबंधीत एका सीनविषयी सांगितलं होतं. ज्यात सलमान खानला मिठी मारायची होती. या सीनविषयी ऐकल्यानंतर ती घाबरली आणि खूप रडत होती. 

सुरज बडजात्या यांनी दिग्दर्शित केलेला 'मैंने प्यार किया' हा एक रोमॅन्टिक कॉमेडी चित्रपट आहे. प्रेमात असलेले प्रेम आणि सुमन याची गोष्ट या चित्रपटातून प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. सुरुवातीला ते दोघं चांगले मित्र होतात आणि त्यानंतर ते एकमेकांच्या प्रेमात वेडे होतात. पण त्यानंतर त्यांच्या प्रेमात अडचणी येऊ लागतात. पण तरी सुद्धा ते एकत्र येतात. आता हा चित्रपट Cinépolis India आणि PVR थिएटर्समध्ये प्रदर्शित होणार आहे. 

हेही वाचा : 'सासू, आईपासून प्रेग्नंसीची बातमी लपवली, वाईट...'; 'या' कारणामुळे भारतीनं 4 महिने सांगितली नाही Good News

सलमान खान आणि भाग्यश्रीशिवाय या चित्रपटात आलोक नाथ, मोहनीश बहल, रीमा लागू, राजीव वर्मा, अजीत वचानी आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांनी प्रमुख भूमिका साकरल्या आहेत. सलमानच्या कामाविषयी बोलायचे झाले तर तो काही दिवसांपूर्वी तो 'टायगर 3' मध्ये दिसला. आता सलमान खान एआर मुरुगादॉस यांच्या 'सिकंदर' मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट ईद 2025 दरम्यान प्रदर्शित होणार आहे.