पाहा, Akshay Kumar, Rohit Shetty मध्ये चित्रपटाच्या सेटवरच हाणामारी

पाहा हे नेमकं काय सुरुये.... 

Updated: Oct 29, 2021, 03:38 PM IST
पाहा, Akshay Kumar, Rohit Shetty मध्ये चित्रपटाच्या सेटवरच हाणामारी  title=
व्हिडीओ स्क्रीनग्रॅब

मुंबई : अभिनेता अक्षय कुमार हा त्याच्या स्वभावासाठी आणि मनमिळाऊ स्वभावासाठी ओळखला जातो. पण, आता सोशल मीडियावर त्याचा असा व्हिडीओ चर्चेत आला आहे, जे पाहता खिलाडी कुमार नेमकं हे काय करतोय हाच प्रश्न चाहत्यांना पडत आहे.

अभिनेत्री कतरिना कैफही या व्हिडीओमध्ये दिसत आहे. रोहित आणि अक्षयमध्ये वाद होण्य़ास कारणीभूत ठरत आहे एक बातमी. 

माध्यमांमध्ये रोहित आणि अक्षयच्या वादाची बातमी आल्याचं कतरिना वाचते आणि ते पाहूनच तिथं या दोन्ही सेलिब्रिटींमध्ये खरोखरंच हाणामारी सुरु होताना दिसते. 

एकमेकांच्या अंगावर धावून जाणाऱ्या या दोन्ही कलाकारांना पाहून त्यांच्यातील वाद सोडवण्यासाठी इतरही अनेकांना पुढे धावून यावं लागतं. 

इतकं मोठं प्रकरण घडण्यामागे कारण काय, असा प्रश्न तुम्हाला पडत असल्यास ही हाणामारी खरी नाही. 2019 मध्ये हा व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. 

आता पुन्हा एकदा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याची तारीख जवळ य़ेताच हा व्हिडीओ नव्यानं चर्चेत आला आहे. जो प्रचंड व्हायरल होत आहे.  

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

अक्षयचा आगामी चित्रपट 'सूर्यवंशी' आचा प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख वारंवार पुढे ढकलली गेली. पण, आता अखेर दिवाळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.