गाढवावर स्वार 'हा' अभिनेता बनलाय 'फिरंगी'

'हम से ज्यादा नेक  इन्सान इस धरती पे कहीं नहीं मिलेगा आपको.' 

Updated: Sep 24, 2018, 12:26 PM IST
गाढवावर स्वार 'हा' अभिनेता बनलाय 'फिरंगी'  title=

अमिताभ बच्चन, कतरिना कैफ, फातिमा सना शेख यांच्यामागोमाग आता 'ठग्स ऑफ हिंदोस्तान'मधील आणखी एका कलाकाराच्या लूकवरुन पडदा उचलण्यात आला आहे. तो कलाकार म्हणजे अभिनेता आमिर खान. या चित्रपटातील आमिरचा लूक पाहता तो कमालीचा लक्षवेधी वाटत आहे. 

'फिरंगी मल्लाह' असं तो साकारत असलेल्या पात्राचं नाव असून, खुद्द आमिरनेच त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन हा लूक शेअर केला आहे. 

'और इ हैँ हम, फिरंगी मल्लाह. हम से ज्यादा नेक  इन्सान इस धरती पे कहीं नहीं मिलेगा आपको. सच्चाई तो हमरा दूसरा नाम है, और भरोसा हमरा काम. दादी कसम !!!', असं कॅप्शन देत त्याने मोशन पोस्टर शेअर केला. 

कुरळे केस, डोळ्यांवर रंगीत चष्मा, सोबत असणारी मद्याची बाटली अशा एकंदर रुपात आमिर सर्वांनाच सलाम ठोकताना दिसत आहे. 

'ठग्स....'च्या या टोळीत आता आमिरची भूमिका नेमकी असणार तरी काय, हेच जाणून घेण्यासाठी आतचा प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 

एका वेगळ्याच दुनियेची सफर घडवणारा हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याआधी म्हणजेच २७ सप्टेंबरचा चित्रपटाच्या ट्रेलरमधून 'ठग्स...'ची एक झलक पाहण्याची संधी सिनेरसिकांना मिळणार आहे.