दु:खद बातमी! सलमान खानला Bodygaurd बनवणाऱ्या दिग्दर्शकाचे निधन

Siddique Ismail Death: 2011 साली आलेला सलमान खानचा 'बॉडीगार्ड' हा लोकप्रिय चित्रपट आपण सर्वांनीच पाहिला असेलच. त्या चित्रपटाच्या लोकप्रियस दिग्दर्शकाचे काल अचानक निधन झाले आहे. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते.  

गायत्री हसबनीस | Updated: Aug 9, 2023, 10:21 AM IST
दु:खद बातमी! सलमान खानला Bodygaurd बनवणाऱ्या दिग्दर्शकाचे निधन title=
bodyguard director siddique ismail dies latest bollywood news in marathi

Salman Khan Bodyguard Director Dies: सलमान खान याचा 2011 साली आलेला 'बॉडीगार्ड' हा चित्रपट प्रचंड गाजला होता. समोर आलेल्या माहितीनुसार, या चित्रपटाच्या दिग्दर्शकाचे काल आकस्मिक निधन झाले. लोकप्रिय मल्ल्याळम फिल्ममेकर सिद्दीकी इस्माईल यांचे आकस्मिक निधन झाले आहे. 8 ऑगस्ट रोजी त्यांच्या निधनाची बातमी समोर आली असून सिनेचित्रपटसृष्टीत याबाबत हळहळ व्यक्त केली जाते आहे. त्या लिव्हर संदर्भात काही आरोग्याच्या समस्या होत्या त्यामुळे त्यांना 10 जूलै रोजी रूग्णालयात भरती करण्यात आले होते. परंतु 7 ऑगस्ट रोजी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांनी तिथूनच ICU मध्ये भरती करण्यात आले होते. सलमान खानचा 'बॉडीगार्ड' हा चित्रपट प्रचंड गाजला होता. त्यांच्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवरही तूफान हीट झाला होता. सध्या त्यांच्या निधनानं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते आहे. 

ईटाईम्सच्या रिपोर्टनुसार, त्यांच्यावर न्यूमोनियाचेही उपचार सुरू होते. त्यांना पुर्णत: वैद्यकीय दक्षतेखाली ठेवण्यात आले होते. परंतु त्यांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. त्यांचे पार्थिव हे राजीव गांधी इंदूर स्टॅडियम येथे ठेवण्यात येईल. त्यानंतर त्यांच्या राहत्या घरी ते नेण्यात येईल असं कळते आहे. आज संध्याकाळी 6 वाजता त्यांच्यावर अत्यंसंस्कार हे केले जाणार आहेत. गेल्या काही वर्षात मनोरंजन आणि बॉलिवूड क्षेत्रातून अनेक लोकप्रिय कलाकार आणि तारे निखळले आहे. त्यामुळे या क्षेत्रात त्यानं हळहळ व्यक्त केली जाते आहे. सिद्दीकी इस्माईल यांनी दाक्षिणात्त्य तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत आपले वेगळे असे नावं कमावले होते. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा होती. त्यांचे अनेक चित्रपट हे हीट झाले होते. त्यांच्या दिग्दर्शन कौशल्याचेही सर्वत्र कौतुक केले गेले होते. 

हेही वाचा - ठरलं! फरहान अख्तरची मोठी अपडेट; 'डॉन 3' मध्ये शाहरुखला रिप्लेस करणार रणवीर सिंग

सिद्दीकी इस्माईल हे 63 वर्षांचे होते. त्यांच्या पाठी त्यांची पत्नी आणि त्यांना तीन मुलं आहेत. 'हिटलर', 'गॉडफादर', 'साहू मिरांडा', 'क्रॉनिक बॅचलर' असे त्यांचे अनेक सिनेमे हे गाजले होते. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा होती. त्यांनी अनेक साऊथ इंडियन चित्रपटांतून कामं केली आहेत. त्यांचा जन्म 1 ऑगस्ट 1960 रोजी झाला होता. त्यांनी आपल्या दिग्दर्शन करिअरची सुरूवात ही लोकप्रिय दिग्दर्शक फाजिल यांच्यासमवेत केली होती. त्यांनी त्यानंतर अनेक चित्रपटांतून कामं केली. 

सध्या त्यांच्या निधनानं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते आहे. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x