मुंबई : प्रेम ही जगातील सर्वात महत्वाची आणि सुंदर गोष्ट आहे. पण सत्य हेही आहे की आयुष्यात प्रेम सर्वांनाच मिळत नाही. अनेक कलाकार कॅमेऱ्याच्या चकाकीमागे त्यांचं खरं आयुष्य जगतात. हे जीवन तुमच्या आणि आमच्या विचारापेक्षा खूप वेगळं आहे. तुम्हाला त्यांच्याबद्दल कितीही जाणून घ्यायचं असेल, परंतु कोणतीही बातमी किंवा सोशल मीडिया फॅनपेज तुम्हाला कोणाच्याही तरी वास्तविक जीवनाबद्दल सांगू शकत नाही.
बॉलिवूडपासून हॉलिवूड इंडस्ट्रीपर्यंत असे अनेक सेलिब्रिटी आले, ज्यांनी आपल्या आयुष्याला कंटाळून मृत्यूला कवटाळणं योग्य मानलं. असे काही आहेत ज्यांनी आपल्या वेदना विसरण्यासाठी दारू आणि ड्रग्सकडे वळले. त्याचबरोबर अशी अनेक माणसं झाली आहेत जी आयुष्यभर माणसांच्या गर्दीत राहूनही प्रेमासाठी तळमळत असतात. आज आम्ही अशाच काही अभिनेत्रींबद्दल बोलत आहोत ज्यांनी अशाच गोष्टी पाहिल्या आणि जगल्या आहेत.
मर्लिन मुनरो
मर्लिन मुनरो ही हॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक होती. पडद्यावरील मर्लिनचं सौंदर्य आणि विनोदी शैली प्रेक्षकांना खूप आवडली. पण त्यांचं खरं आयुष्य आपण पडद्यावर पाहिलेल्या प्रतिमेपेक्षा खूप वेगळं असतं. वास्तविक जीवनात, ती नॉर्मा जीन होती, ती प्रसिद्ध मर्लिन मुनरो असल्याचे भासवत होती.
मर्लिननं तिच्या आयुष्यात खूप त्रास सहन केला होता. तिची आई आजारी पडल्यानंतर तिला तिचं बालपण अनाथासारखं घालवावं लागलं. यानंतर जेव्हा तिला आयुष्यात प्रेम मिळालं तेव्हा तेही जास्त काळ टिकू शकलं नाही. मर्लिननं तीन लग्नं केली पण तरीही तिला एकटी असल्याचा वाटत होतं. तिला मुलं हवी असतील तरी तेही होऊ शकत नाही. एक काळ असा होता की ती एखाद्या अनामिकासारखी न्यूयॉर्कमधल्या थिएटरमध्ये क्लासेस घ्यायची. आयुष्यातील दुःखानं परिसीमा ओलांडली तेव्हा ती घरात मृतावस्थेत आढळून आली. तिचा मृत्यू कसा झाला हे कोणालाच माहीत नाही.
सिल्क स्मिता
दाक्षिणात्य चित्रपटातील 'सेक्स सिम्बॉल' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिल्क स्मिताचे अनेक चाहते होते. तिच्या कामुक अदांवर लोक घायाळ झाले होते. 17 वर्षांच्या करिअरमध्ये सिल्कनं पाच भाषांमधील 450 चित्रपटांमध्ये काम केलं. तिची कारकीर्द चढ-उतारांनी भरलेली होती. टचअप आर्टिस्ट म्हणून सुरुवात केलेल्या सिल्कनं 1980 मध्ये मोठ्या पडद्यावर प्रवेश केला आणि मागे वळून पाहिले नाही.
सिल्क ही गरीब कुटुंबातील मुलगी होती. गरिबीमुळे तिला चौथीच्या पुढे शिक्षण घेता आलं नाही. वयाच्या 14 व्या वर्षी बळजबरीनं तिचं लग्न लावून दिलं. ज्या व्यक्तीसोबत तिचं लग्न ठरलं होतं त्या व्यक्तीला ना ती ओळखत होती, ना तिला कोणी सांगितलं होतं की तिचं लग्न होणार आहे. या लग्नात पतीने तिच्याशी गैरवर्तन केलं. त्याचवेळी त्याच्या आई-वडिलांनीही तिचा छळ केला, अशा स्थितीत हे नातं काही वर्षांतच संपुष्टात आले.
मीना कुमारी
मीना कुमारीच्या बायोपिकमध्ये विनोद मेहता यांनी सांगितलं होतं की, जेव्हा तिचा जन्म झाला तेव्हा तिच्या वडिलांनी तिला डॉक्टरांच्या दारात सोडलं होतं. याचं कारण त्यांच्याकडे पैशांची कमतरता होती. किशोर कुमारचा भाऊ अशोकमुळे तिची भेट पती कमाल अमरोही यांच्याशी झाली. कमल आधीच विवाहित आणि त्यांना तीन मुलं होती. दोघेही लग्न करणार असताना कमलला आर्थिक चणचण भासू लागली.
दोघांचं लग्न होणं खूप कठीण होतं. मीनानं कमलसोबत गपचुप लग्न केलं. लग्नानंतर कमलनं त्याच्यावर अनेक बंधने लादली. या नंतर काही गोष्टींमुळे ते विभक्त झाले. कमलपासून विभक्त झाल्यानंतर मीना डिप्रेशनमध्ये गेली. दारू पिऊन दु:ख विसरण्याचा प्रयत्न केला. डॉक्टरांच्या नकारानंतरही त्याने दारू सोडली नाही आणि एक दिवस तिचं निधन झालं.
परवीन बाबी
परवीन बाबी देखील अशा अभिनेत्रींपैकी एक आहे, जिनं तिच्या आयुष्यात खूप काही सहन केलं. लोकांच्या गर्दीत एकटं राहणं आणि प्रेमाच्या शोधात भटकणं हा त्यांच्या आयुष्याचा एक भाग होता. पडद्यावरचे परवीनची जादू ही वेगळी होती. 70 च्या दशकात तिची गणना 'बोल्ड आणि बिंदास' अभिनेत्रींमध्ये केली जायची. त्यांची कारकीर्दही जबरदस्त होती आणि त्यांना त्यांच्या चित्रपटात घेण्यासाठी निर्मात्यांची रांग लागली होती. पण प्रेमाच्या बाबतीत परवीन नेहमीच यशस्वी ठरली नाही.
अनेक बड्या कलाकारांसोबत तिचं नाव जोडलं गेलं. त्यात डॅनी डेन्झोंगपा, कबीर बेदी आणि दिग्दर्शक महेश भट्ट यांचा समावेश होता. पण त्यांचं कोणतेही नाते फार काळ टिकले नाही. तिला पॅरानॉइड स्किझोफ्रेनियाचे निदान झाले, ज्यामुळे तिची प्रकृती अधिकच बिघडली. परवीन आपला बहुतेक वेळ भीतीमध्ये घालवू लागली. ती सगळ्यांपासून दूर अमेरिकेला गेली. यानंतर जेव्हा ती परत आली तेव्हा तिला वाटलं की सर्वजण आपल्या विरोधात कट करत आहेत. परवीन तिच्या शेवटच्या काळात एकटीच होती. तिची शेवटची इच्छाही अपूर्णच राहिली. परवीन तिच्या घरातील खोलीत मृतावस्थेत आढळून आली. तीन दिवसांनी शेजाऱ्यांना ती मृत्यू असल्याचं कळलं. शवविच्छेदनात तिच्या पोटात फक्त दारू असल्याचे आढळून आलं आणि अन्नाचा दाणाही नव्हता.