'भीक मिळाली नाही म्हणून अनुरागकडून अपशब्दांचा वापर'

भाजपकडून दिग्दर्शक अनुराग कश्यप यांचे जूने पत्र लीक  

Updated: Jan 12, 2020, 10:19 AM IST
'भीक मिळाली नाही म्हणून अनुरागकडून अपशब्दांचा वापर' title=

मुंबई : दिग्दर्शक अनुराग कश्यप नेहमी मोदी सरकार विरोधात बेधडक वक्तव्य करत असतो. आता भाजपने अनुराग कश्यपचे काही जुने पत्र सोशल मीडियावर प्रसारित केले. या पत्रांच्या माध्यमातून अनुरागने चित्रपट साकारण्यासाठी उत्तर प्रदेशच्या योगी सरकारकडून अनुदान मागण्याचा प्रयत्न केला होता. भाजपचे प्रवक्ता शलभ मणी त्रिपाठी यांनी ट्विटरच्या माध्यमातून हे पत्र लिक केले आहेत. 

शलभ पत्रांची पत्र शेअर करत म्हणाले की, 'मारहान केलेल्या चित्रपटांसाठी सरकारी भीक मिळाली नाही तर अनुराग कश्यप यांनी अपशब्दांचा वापर केला. काही सरकार त्यांच्या फ्लॉप चित्रपटांवर कोटी रुपये द्यायची. तर योगी यांनी नि:शुल्क पेन्शन बंद करून तेच पैसे गरीब, विधवा आणि शेतकऱ्यांना वाटल्यामुळे त्यांच्या मनात चीड निर्माण झाली.'

अनुरागने देखील सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आलेल्या पत्रांवर ट्विटरच्या माध्यमातून उत्तर दिले आहे. तो म्हणाला, ' अनुदानासाठी मला गेल्यावर्षी तीन वेळा बोलावण्यात आलं. पण मी त्याठिकाणी गेलो नाही. कारण पहिल्यांदा मला दिसून आलं की ते कशासाठी बोलावतात आणि माझ्यातील आत्मसन्मान आजूनही जिवंत आहे.'

त्याचप्रमाणे प्रमाणे प्रत्येक पत्राच्या प्रती माझ्याकडे देखील आहे असे त्याने ट्विटरच्या माध्यमातून सांगितले. अनुराग कश्यपने 'सांड की  आँख' आणि 'मुक्केबाज' चित्रपटासाठी उत्तर प्रदेश सरकारकडून अनुदानाची मागणी केली. 

पण काही औपचारिक प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे योगी सरकारकडून अनुदान मिळाले नाही. जेव्हा अखिलेश यादव उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते. तेव्हा 'मसान' चित्रपटासाठी अनुराग कश्यपला २ कोटी रूपयांचे अनुदान २०१६ साली मिळाले होते.