बॉलिवूडमध्ये खळबळ माजवणारे KISS, वडील आणि मुलीने तर...

रुपेरी पडद्यावरचं नाही, तर खऱ्या जीवनात देखील  KISS मुळे वादात अडकले सेलिब्रीटी... अभिनेत्री दीपिका पादुकोणचा तो फोटो म्हणजे...   

Updated: May 21, 2022, 11:56 AM IST
बॉलिवूडमध्ये खळबळ माजवणारे KISS, वडील आणि मुलीने तर...  title=

मुंबई  : बॉलिवूडमध्ये अनेकदा किसिंग सीन देणारे कलाकार वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. अनेक सेलिब्रिटी किसमुळे फक्त चर्चेतच आले असे नाही पण अनेकदा ते वादात देखील अडकले आहेत. आज आपण अशाच कलाकारांचे किसींग वाद बघणार आहोत. 

दीपिका पदुकोणा - सिद्धार्थ माल्या 

Image result for deepika padukone siddharth mallya
दीपिका पदुकोण सिद्धार्थ माल्यासोबत 2013 मध्ये किसिंग सीनमुळे खूप चर्चेत आली होती. त्यावेळी IPL टीम रॉयल चॅलेंजर बंगलुरू आणि कोलकाता नाइट रायडर्समध्ये सामना सुरू होता. दीपिका सिद्धार्थसोबत सामना बघत होते. जेव्हा रॉयल चॅलेंजर हा सामना जिंकली अगदी त्याच क्षणी सिद्धार्थने दीपिकाला पकडून किस केलं आणि याची खूप चर्चा झाली. 

महेश भट्ट - पूजा भट्ट

pooja bhatt

दिग्दर्शक - निर्माता महेश भट्ट हे अनेकदा वादात अडकले आहेत. त्यातीलच एक वाद म्हणजे महेश भट्ट यांनी आपलीच मुलगी पूजा भट्टला केलेलं किस. खूप वर्षांपूर्वी यांनी स्टारडस्ट मॅगझीनकरता पूजासोबत लिपलॉक करताना सीन दिला होता. हे फोटोशूट मॅगझीनच्या कव्हरपेजवर छापण्यात आलं. हा फोटो खूप वादात अडकला होता. यानंतर महेश भट्ट यांनी एक स्टेटमेंट दिलं होतं की, जर पूजा माझी मुलगी नसती तर मी तिच्याशी लग्न केलं असतं. 

राखी आणि मिका सिंह 
2007 मध्ये जेव्हा राखी सावंत मिकाच्या बर्थ डे पार्टीत गेली होती. तेव्हा मिकाने तिला पकडून जबरदस्ती किस केलं होतं. यानंतर खूप मोठा वाद झाला होता. ज्यानंतर राखी सावंत मिकावर खूप भडकली होती. हे प्रकरण अगदी पोलिसांपर्यंत गेलं होतं. 

बिपाशा बासू - क्रिस्टियानो रोनाल्डो 

फुटबॉलमधील लोकप्रिय खेळाडू रोनाल्डोने बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासूला सर्वांसमोर किस करून अगदी भारतीय मीडियामध्ये चर्चेत राहिला होता. क्रिस्टियानो आणि बिपाशाचं हे किस एवढं वादात अडकलं की जॉन अब्राहमसोबत त्यांच ब्रेकअप झालं. 

लीना चंद्रावरकर - राम जेठमलानी 
2015 मध्ये देशातील लोकप्रिय वकील राम जेठमलानी एका अवॉर्ड फंक्शनमध्ये लोकप्रिय अभिनेत्री लीना चंद्रावरकरला खूप जोरात लिपलॉक केलं होतं. या किसची खूप चर्चा झाली.