Aryan Khan च्या विरोधात करणाऱ्यांवर भडकली Urfi Javed

 'बिग बॉस ओटीटी' फेम उर्फी जावेद बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या समर्थनार्थ पुढे आली आहे. 

Updated: Oct 14, 2021, 12:33 PM IST
Aryan Khan च्या विरोधात करणाऱ्यांवर भडकली  Urfi Javed title=

मुंबई : 'बिग बॉस ओटीटी' फेम उर्फी जावेद बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या समर्थनार्थ पुढे आली आहे. एनसीबीने आर्यनला ताब्यात घेतल्यानंतर, त्याच्यावर अनेक आरोप करण्यात आले आहेत, की त्याने एका पार्टीला हजेरी लावली होती जिथे ड्रग्जचे सेवन केले जात होते. सध्या आर्यन कोठडीत असून या प्रकरणाची चौकशी केली जात आहे.

उर्फी जावेद काय म्हणाली...

या प्रकरणात उर्फी जावेदने सांगितले की, कदाचित त्याला या धक्क्यातून बाहेर येण्यास बराच वेळ लागेल. न्यायालयाच्या निर्णयाआधीच लोकांनी त्याला बरं वाईट बोलायला सुरूवात केली आहे. कारण तो शाहरुख खानचा मुलगा आहे. बलात्कार आणि  हत्या करणाऱ्यासाठी आपण समान आक्रोश का दाखवत नाही? न्यायालयाच्या निर्णयाआधीच कलाकारांची बदनामी करण्याची आम्हाला घाई आहे. बलात्काऱ्यांना लाजवण्याच्या बाबतीत आपण इतक्या वेगाने का वागत नाही? असा सवाल उर्फीने केला आहे.

या कारणांमुळे उर्फी ​​जावेद चर्चेत

उर्फी तिच्या एअरपोर्टवरील लुकसाठी ओळखली जाते आणि 'बडे भैया की दुल्हनिया', 'मेरी दुर्गा' आणि 'बेपनाह' सारख्या शोमुळे ती चर्चेत असते. ती म्हणाते की, राजकीय नेते, धार्मिक गुरु आरोपांना सामोरे जात आहेत. बलात्कारानंतरही लोक त्याची पूजा करतात, आणि आम्ही अशा मुलाच्या मागे आहोत ज्यांनी कोणालाही इजा केली नाही, पण इतक्या मोठ्या प्रमाणावर लोक त्याच्या विरोधात बोलत आहेत.