मुंबई : 'बिग बॉस'च्या घरात कुणी आलं आणि भांडण झालं नाही... असं होणारच नाही... असंच झालंय जेव्हा या कार्यक्रमात सहभागी झालेल्या प्रतिस्पर्ध्यांच्या नातेवाईकांना 'शेजारी' म्हणून या घरात एन्ट्री मिळाली.
बुधवारच्या भागात शेजारी बनून आलेल्या प्रतिस्पर्ध्यांच्या आई एकमेकींशी भांडताना दिसल्या. बिग बॉसच्या घरात सध्या विकास, आकाश, प्रियांक आणि लवची आई आलेल्या आहेत. याशिवाय हिनाचा बॉयफ्रेंड रॉकी, पुनीशची याच कार्यक्रमात गर्लफ्रेंड बनलेली बंदगी आणि शिल्पा शिंदेच्या भावालादेखील एन्ट्री देण्यात आलीय.
अशावेळी बिग बॉसनं लग्जरी बजेट कार्य देताना वेळोवेळी एखाद्या कन्टेस्टंटची दखल घेणं टाळायचंय... आणि तो कन्टेस्टंट आपली दखल घ्यायला इतरांना भाग पाडायला लावणार आहे. या टास्कमध्ये 'शेजारी' कंटेस्टंटला कुणी कुणी प्रतिक्रिया दिल्या हे मोजणार आहेत.
अशा वेळी आकाशनं केलेल्या हरकतींवर त्याच्या आईला इतरांचे टोमणे आणि आकाशवरील प्रतिक्रिया ऐकाव्या लागल्या. यामुळे आकाशची आई चांगलीच भडकली...
Akash Dadlani's mother gets upset with the comments made about her son. Tune in tonight at 10:30 PM to watch #BB11. #BBSneakPeek pic.twitter.com/yEChM07C9F
— Bigg Boss (@BiggBoss) December 27, 2017
.@lostboy54 seems to be really upset! Find out why, tonight at 10:30 PM on #BB11. #BBSneakPeek pic.twitter.com/18vkLdM9ae
— COLORS (@ColorsTV) December 27, 2017