Bhool Bhulaiyaa 3 पाहण्याआधी वाचा Audience Review; हिट की फ्लॉप, कसा आहे चित्रपट?

Bhool Bhulaiyaa 3 First Audience Review : सिनेमागृहांमध्ये दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या 'भूल भुलैय्या' या चित्रपटाची सुरुवातीला बरीच चर्चा झाली...   

सायली पाटील | Updated: Nov 1, 2024, 12:54 PM IST
Bhool Bhulaiyaa 3 पाहण्याआधी वाचा Audience Review; हिट की फ्लॉप, कसा आहे चित्रपट?  title=
Bhool Bhulaiyaa 3 First audience Review in marathi

Bhool Bhulaiyaa 3 First Audience Review : दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या 'भूल भुलैय्या 3' या चित्रपटाची सुरुवातीपासून बरीच चर्चा झाली. अनीस बाझ्मीच्या या चित्रपटाची गणती सध्या हॉरर कॉमेडी या धाटणीत करण्यात येत असून, दिवाळीच्या दिवसांमध्ये हा एक एंटरटेन्मेंट पॅक असेल अशीच अनेकांनी अपेक्षा ठेवली होती. अखेर हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि पाहता पाहता First Day First Show नुसार त्याचे रिव्ह्यूसुद्धा चाहत्यांनी शेअर केले. 

X च्या माध्यमातून चाहते या चित्रपटासंदर्भात व्यक्त झाले. काहींच्या मते कार्तिकनं साकारलेल्या 'रुह बाबा' या पात्रानं पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकली. एकिकडे चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी चित्रपटाला 4 Star दिले असतानाच चाहत्यांनी मात्र स्क्रीप्ट अजिबातच न आवडल्याचं म्हटलं आहे. 

एका X युजरनं लिहिलं, 'हा चित्रपट कमाल असावा असं मला वाटत होतं. पण, स्क्रीप्ट अतिशय वाईट आणि बळजबरीनं साकारल्यासारखी वाटत होती. एकंदर अतिशयोक्तीच...'. आणखी एका युजरनं लिहिलं, स्क्रीप्टचा कलाकारांच्या अभिनयाशी काहीच संबंध नसल्याचं म्हणत मला जरा जास्तच अपेक्षा होत्या, असं मत मांडत चित्रपट आवडला नसल्याचं स्पष्ट सांगितलं. 

हेसुद्धा वाचा : Singham Again Twitter Review : 'सिंघम अगेन' येताच रोहित शेट्टी चौथ्या पार्टच्या तयारीला; आता नव्या मिशनवर येणार 'चुलबुल'

 

'हे किती व्यर्थ आहे... हे जणू त्या जुन्या वाईनच्या बाटलीसारखं आहे. कथा नवी नसून, पहिल्या आणि दुसऱ्या भागांना जोडून तयार करण्यात आली आहे. कोणताही डायलॉग अपेक्षित जागी बसत नाहीय. बरं, विनोदी दृश्यही कमीच....', असं एका युजरनं लिहिलं. एकंदरच सिनेप्रेमींनी दिलेल्य़ा प्रतिक्रिया पाहता पहिल्या भागाच्या निमित्तानं गाजलेला 'भूल भुलैय्या' तिसऱ्या भागातून अर्थात 'भूल भुलैय्या 3' मधून प्रेकक्षकांची मनं जिंकू शकलेला नाही. त्यामुळं आता हा चित्रपट सुट्टीच्या या Long Weekend ला नेमकी कशी कमाई करतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.