मुंबई : भोजपुरी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री अक्षरा सिंग (Akshara Singh) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. अभिनयासोबतच अक्षराच्या आवाजाचेही लाखो चाहते आहेत. अक्षरा ही तिच्या स्पष्ट वक्तव्यामुळे आणि फॅशनमुळे नेहमीच चर्चेत असते. नुकताच अक्षराचा एका लाइव्ह परफॉर्मन्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत अक्षरासोबत एक व्यक्ती गैरवर्तन करताना दिसत आहे. त्यानंतर, अक्षरानं एक मोठं पाऊल उचललं आणि शो मध्येच सोडते.
हेही वाचा : Galwan चा उल्लेख करत Richa Chadha नं उडवली भारतीय लष्कराची खिल्ली; भाजप नेत्यानं दिलं सडेतोड उत्तर
खरंतर अक्षरा सिंग स्टेजवर लाईव्ह परफॉर्मन्स देत आहे. ती स्टेजवर गात असते. पण तितक्यात एक व्यक्ती स्टेजवर येतो आणि अभिनेत्रीवर नोटा उडवतो. तो नोटांचं बंडल उडवतो. यानंतर काय झालं, अक्षरा रागावली आणि ती माईक परत करत स्टेजवरून निघून जाते. व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये अक्षरानं लाल रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये स्टेजवरून परतताना अक्षरा सिंहच्या चेहऱ्यावरचा राग स्पष्ट दिसत आहे. ती अशा प्रकारे मंचावरून निघून गेल्याने प्रेक्षक ही निराशा झाले. अक्षरा तिच्या मुलाखतींमध्ये यापूर्वीही अशा घटनांबद्दल बोलली आहे. नोटा उडवण्यापासून ते दगडफेकीपर्यंत अनेक स्टेज शोमध्ये झालेल्या घटनांनविषयी ती बोलली आहे.
अलीकडेच अक्षराबद्दल एक बातमी समोर आली होती की बिहारमधील तिच्या घराबाहेर पोलिसांनी नोटीस चिकटवली होती. नोव्हेंबर 2021 मध्ये माजी आमदार आणि बाहुबली मुन्ना शुक्ला यांना त्यांच्या भाच्याच्या उपनयन संस्कारासाठी त्यांच्या घरी बोलावण्यात आले होते आणि याचदरम्यान अभिनेत्रीच्या स्टेज शोदरम्यान गोळीबार झाला होता, ज्याचा व्हिडिओही समोर आला होता. यासंदर्भात त्यांच्या घरावर जाहिरात चिकटवण्यात आली होती. ती घरातून पळून जात असल्याचे म्हटले जात होते. मात्र, नंतर त्यांच्या वकिलाकडून याबाबत खुलासा करण्यात आला.