वॉशरूमसाठी धावत निघाली भारती सिंह, पापाराझींनी थांबवलं तर म्हणाली, जाऊद्या नाहीतर...

प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंग कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. आता तिचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे, जो खूपच मजेदार आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू येईल.

Updated: May 9, 2022, 10:03 AM IST
वॉशरूमसाठी धावत निघाली भारती सिंह, पापाराझींनी थांबवलं तर म्हणाली, जाऊद्या नाहीतर... title=

मुंबईः प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंग नुकतीच एका मुलाची आई झाली आहे. सध्या ती पती हर्ष लिंबाचियासोबत आपल्या मुलाची काळजी घेत आहे. याशिवाय ती तिच्या कामावरही लक्ष देत आहे. दरम्यान, भारती सिंगचा एक व्हिडिओ समोर आला आहे, जो खूपच मजेदार आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हालाही हसू आवरता येणार नाही.

व्हिडिओमध्ये भारती सिंग व्हॅनिटी व्हॅनच्या दिशेने जाताना दिसत आहे. समोर फोटोग्राफर उभे असल्याचे तिला दिसताच ती त्यांच्या दिशेने वेगाने चालायला लागली. पापाराझी म्हणतात की मॅम हळू चालत जा तुम्हाला लागेल. यावर ती म्हणते, 'मी 5 तास उभी आहे. मला वॉशरूमला जावंच लागेल.' हे ऐकून सगळे हसायला लागतात.

यानंतर भारती व्हॅनिटी व्हॅनमध्ये जाते आणि म्हणते, 'माझी किडनी कधीपासून खराब झाली आहे'. मग ती व्हॅनिटी व्हॅनच्या आत जाते आणि म्हणते, 'मी जेवल्यावर येते'. भारती सिंहचा हा व्हिडिओ गेल्या वर्षीचा आहे, जो सध्या इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत आहे.

भारती सिंग गेल्या महिन्यात एका मुलाची आई झाली आहे, ज्याला ती प्रेमाने गोला म्हणते. मात्र, भारतीने अद्याप मुलाचा चेहरा दाखवलेला नाही. नुकताच भारतीचा एक व्हिडिओ समोर आला होता, ज्यामध्ये तिने आपल्या मुलाचा चेहरा न दाखवण्याचे कारण सांगितले होते.