Bhabiji Ghar Par Hai! च्या Manmohan Tiwariची बायको अंगुरी भाभीपेक्षा काही कमी नाही...पाहा फोटो

मालिकेत मनमोहन तिवारीची भूमिका साकारणारा रोहिताश (Rohitashv Gour) एक अतिशय आनंदी व्यक्ती असल्याचे दाखवण्यात आले आहे.

Updated: Aug 17, 2021, 12:39 PM IST
Bhabiji Ghar Par Hai! च्या Manmohan Tiwariची बायको अंगुरी भाभीपेक्षा काही कमी नाही...पाहा फोटो title=

मुंबई : 'भाबीजी घर पर है!' (Bhabiji Ghar Par Hai!) मध्ये मनमोहन तिवारीची भूमिका साकारणारा रोहिताश गौर (Rohitashv Gour) वास्तविक जीवनात अतिशय सौम्य आणि साधा माणूस आहे. रोहितशला त्याच्या कुटुंबासोबत वेळ घालवणे फार आवडते. रोहितश सध्या सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांसह तो त्याचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असतो. रोहिताशला दोन गोड मुली देखील आहेत.

मालिकेत मनमोहन तिवारीची भूमिका साकारणारा रोहिताश (Rohitashv Gour) एक अतिशय आनंदी व्यक्ती असल्याचे दाखवण्यात आले आहे. मनमोहन तिवारीची सुंदर बायको असून सुद्धा त्याचा इंटरेस्ट त्याच्या शेजाऱ्याच्याच्या बायकोमध्ये जास्त आहे. शो मधील त्याच्या पत्नीच्या पात्राचे नाव अंगूरी आहे, परंतु त्याची वास्तविक जीवनातील पत्नी देखील अंगूरीपेक्षा कमी नाही.

रोहिताश गौरच्या खऱ्या पत्नीचे नाव रेखा गौर आहे. रेखा खूप सुंदर आहे आणि रोहिताश सोबत तिची जोडी खूप चांगली आहे. दोघे मिळून अप्रतिम दिसतात.

रोहितश गौरची पत्नी टीव्ही किंवा बॉलिवूड अभिनेत्री नाही किंवा त्याचा टीव्ही किंवा बॉलिवूड इंडस्ट्रीशी काही संबंध नाही. रेखा गौरचा प्रोफेशन रोहिताशच्या प्रोफेशपासून पूर्णपणे वेगळा आहे आणि दोघेही करिअरमध्ये एकमेकांना आधार देतात.

रोहिताश गौरची पत्नी रेखा गौर देखील अभिनेत्याप्रमाणे सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. रोहिताश प्रमाणेच, ती देखील मजेदार व्हिडीओ आणि फोटो पोस्ट करत राहते, ती देखील कुटुंबासोबत खूप मजा करते.

रोहिताश गौरची पत्नी रेखा गौर ही एक अत्यंत साधी आणि सरळ महिला आहे. सडपातळ आणि लांब दिसणारी रेखा गौर शोऑफपासून दूरच आहे. टीव्ही अभिनेत्याची पत्नी झाल्यानंतरही तिने मेकअप आणि ग्लॅमरस कपड्यांपासून अंतर ठेवले आहे. ती रोहिताश बरोबर साध्या पद्धतीने स्पॉट होत असते.

रोहिताश गौर आणि पत्नी रेखा गौर हे दोन सुंदर मुलींचे पालक आहेत. त्यांच्या एका मुलीचे नाव गीत गौर आणि दुसऱ्या मुलीचे नाव संगीत गौर आहे. रोहिताश आपल्या मुलींसोबत अनेक मजेदार क्षणांचे व्हिडीओ शेअर करत असतो. त्याचबरोबर रेखा मुलींसोबत बरीच चित्रे आणि व्हिडीओही शेअर करते.