Beshram Rang मध्ये शाहरूखनं घातलेल्या चपला, चष्मा आणि शर्टची किंमत पाहून भगव्या बिकीनीचा वादही विसराल

Shahrukh Khan Besharam Rang Song Shirt Shoe and Sunglasses Price: बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान (shah rukh khan reaction on pathaan controversy) याच्या पठाण या चित्रपटाची प्रेक्षकांच्या आणि त्याच्या चाहत्यांना विशेष उत्सुकता लागून राहिली होती. परंतु आता या चित्रपटावरून आता वादांगाला सुरूवात झाली आहे. 

Updated: Dec 17, 2022, 01:43 PM IST
Beshram Rang मध्ये शाहरूखनं घातलेल्या चपला, चष्मा आणि शर्टची किंमत पाहून भगव्या बिकीनीचा वादही विसराल title=
shah rukh khan

Deepika Padukone Saffron Bikini Controversy: बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान (shah rukh khan reaction on pathaan controversy) याच्या पठाण या चित्रपटाची प्रेक्षकांच्या आणि त्याच्या चाहत्यांना विशेष उत्सुकता लागून राहिली होती. परंतु आता या चित्रपटावरून आता वादांगाला सुरूवात झाली आहे. या चित्रपटातील बेशरम रंग (Beshram Rang) हे गाणं काही दिवसांपुर्वी सोशल मीडियावर प्रदर्शित झाले आहे. या गाण्याच्या व्हिडीओला (video) जगभरातून प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असतानाच या चित्रपटावर वादंगाचे ग्रहण लागले आहे. त्यामुळे फक्त हे गाणंच नाही तर पठाण हा चित्रपटही वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. बेशरम रंग या गाण्यात दीपिका पादूकोण हिनं घातलेली केशरी रंगाची बिकीनी (Saffron Bikini) हिंदूच्या भावभावना दुखावणारी असून केशरी रंगाच्या बिकीनीतलं दीपिकानं शाहरूखसोबत केलेला डान्स अश्लील असल्याचं हिंदू संघटनांचे म्हणणे आहे. गेल्या चार दिवसांपासून हा वाद भडकला असून यामुळे सध्या बॉलिवूड पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. (besharam rang song you will forget deepika padukones bikini after hearing price of shah rukh khans clothes in the song) 

या वादंगानंतर शाहरूख खाननंही आपली प्रतिक्रिया नोदंवली आहे. तर सध्या सुरू झालेल्या वादंगावर खुद्द बीग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan Reaction on Pathaan Controversy) यांनीही आपली प्रतिक्रिया सगळ्यांसमोर मांडली आहे. परंतु आता यामुळे शाहरूख खान आणि दीपिकाचीही चोरदार चर्चा रंगली आहे. दीपिकीच्या बिकीनीपासून सुरूवात होत ही बिकीनी कोणी डिझाईन केली, या डान्सचा कोरिओग्राफर कोण आहे इथपर्यंत त्या चर्चा रंगल्या आहेत. त्यामुळे सध्या बेशरम रंगचीच सोशल मीडियावर (social media) हवा आहे. सध्या दीपिकाच्या बिकीनीची किंमत किती याची जोरदार चर्चा सुरू असताना आता शाहरूख खाननं घातलेल्या कपड्यांचीही जोरात चर्चा आहे. त्यामुळे शाहरूखच्या शर्ट आणि ट्राऊझरची किंमत किती असेल हे जाणून घेण्याची उत्सुकताही तुम्हाला लागून राहिली असलेच. 

शाहरूख खान पठाण या चित्रपटानंतर 4 वर्षांनी कमबॅक करत आहे. त्याचा शेवटचा सिनेमा हा झिरो (Shah Rukh Khan Last Movie) हा होता. त्यातून आता पठाण हा सिनेमा रिलिजसाठीही सज्ज झाला आहे. पण.. त्याच्या चित्रपटानं नेहमीप्रमाणे रिलिज होण्याआधी वादाची कास धरली आहे, असं म्हटलं तर वावगं ठरू नये. शाहरूख खानच्या या नव्या सिनेमातून त्याला प्रेक्षकांपुढे तो अगदी तरूण दिसावा असा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. शाहरूख खान हा 57 वर्षांचा आहे तर दीपिका पादूकोण ही 36 वर्षांची आहे. त्यामुळे तोही साधारण 35-36 वर्षांचा दिसावा यासाठी त्याचा लुकही थोडा हटके करण्यात आला आहे. त्यामुळे त्याच्या या लुकवर चांगलीच मेहनत घेतल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यातून त्याच्या कपड्यांवरही चांगलाच पैसा खर्च केल्याचे पाहायला मिळाले आहे. बेशरम रंग या गाण्यात शाहरूख खानच्या चष्मा, शर्ट आणि चपलांची किंमत ऐकून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल. 

हेही वाचा - साखरपुड्याच्या दोन दिवसाआधी जवान महिलेचा अपघात, कुटुंबियांवर शोककळा

किती आहे शाहरूखच्या शर्टची किंमत? 

शाहरूखच्या कपड्यांची किंमत वाचून तुम्हीही कदाचित म्हणाल दीपिकाची बिकीनी याच्यापुढे काहीच नाही. या गाण्यात शाहरूख खान वेगवेगळ्या स्टाईल्सच्या कपड्यांमध्ये दिसतो आहे. तो एका प्रिटेंड शर्टमध्ये आहे. समोर आलेल्या माहितीनूसार, या शर्टची किंमत 8 हजार एवढी आहे. तर त्याच्या चपलांची किंमत 1 लाख रूपये एवढी आहे आणि काळ्या चष्म्याची किंमत 41 हजार रूपये एवढी आहे. पठाण हा चित्रपट 25 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांसारख्या स्टार्सनी सजलेला हा चित्रपट 25 जानेवारीला प्रदर्शित होत आहे. दीपिकाच्या बिकिनीच्या रंगावरून झालेल्या वादानंतर आता लोकही हा चित्रपट प्रदर्शित न करण्याचा इशारा देत आहेत. मात्र चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलले जाते की नाही हे येणारा काळच सांगेल. पण दीपिका-शाहरुखच्या या चित्रपटाला बॉलिवूडचा (bollywood support to pathaan) पाठिंबा मिळत आहे.