Arjit Singh च्या चाहत्यांना महागड्या Consert मध्ये विनामूल्य उपस्थित राहण्याची संधी

हजारोंच्या तिकीटावर फुकटात पाहा Arjit Singh चा लाईव्ह कॉन्सर्ट; कसं ते जाणून घ्या  

Updated: Dec 17, 2022, 01:09 PM IST
Arjit Singh च्या चाहत्यांना महागड्या Consert मध्ये विनामूल्य उपस्थित राहण्याची संधी title=
An opportunity for Arjit Singh fans to attend an expensive concert for free in Hyderabad nz

Bollywood Singer Arjit Singh : बॉलिवूड प्रसिद्ध गायक अरिजित सिंगच्या (Arjit Singh) गाण्यांचे जगभरात चाहते आहेत. अरिजित सिंग हा कोणत्या न कोणत्या कारणांमुळे नेहमीच चर्चेत असतो. अलीकडेच त्याच्या कॉन्सर्ट संदर्भात चर्चा रंगली होती. त्याचा सर्वात महागडा कॉन्सर्ट होणार आहे. अरिजित सिंग हैदराबादी चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी येथे एक कॉन्सर्ट (Consert) करणार आहे. हा कॉन्सर्ट 17 डिसेंबर रोजी GMR अरेना शमशाबाद येथे होणार आहे. अरिजित त्याच्या 'वन नाईट टूर ओन्ली'चा एक भाग म्हणून या शहराला भेट देत आहे. 

अरिजित सिंगच्या चाहत्यांसाठी सुवर्ण संधी 

अरिजित सिंगच्या चाहत्यांना त्याच्या शोमध्ये विनामूल्य उपस्थित राहण्याची सुवर्ण संधी आहे. हैदराबादमध्ये विनामूल्य शो बुक करण्याची ही सर्वोत्तम वेळ आहे. तुम्हाला फक्त इन्स्टाग्रामवर जॉन जेकब आयवेअरचे अनुसरण करायचे आहे, त्यानंतर दोन मित्रांना टॅग करा आणि टिप्पण्यांमध्ये तुमचे सर्वोत्कृष्ट गायक अरिजित सिंगचे गाणे लिहा. तुमच्या स्टोरी पोस्ट शेअर करण्यासाठी तुम्हाला ब्राउनी पॉइंट मिळतील.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

तिकिटे कशी जिंकता येतील?

इन्स्टाग्रामवर (Instagram) चाहत्यांसह माहिती शेअर करताना, लोकप्रिय आयवेअर ब्रँडने लिहिले, 'हैदराबादच्या लोकांनो, आमच्याकडे तुमच्यासाठी एक रोमांचक बातमी आहे! जॉन जेकब्ससोबत अरिजित सिंगच्या वन नाईट ओन्ली टूरच्या हैदराबाद लेगसाठी 2 तिकिटे जिंकण्याची ही तुम्हाला संधी आहे.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

तिकीट किंमत 5000

आलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पुण्यात अरिजित सिंगने एक कॉन्सर्ट केला होता. त्या कॉन्सर्टच्या तिकिटांच्या किमती सामान्याच्या खिशाला परवडण्यासारख्या नव्हत्या. एका तिकीटाची किंमत 16 लाखांपर्यंत गेली. नेटिझन्सनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मजेदार मीम्स शेअर केले. पण हैदराबादमध्ये मात्र असं अजून काही घडलेलं नाही. हैदराबादमधील एका तिकिटाची किंमत 5000 च्या आसपास असेल असं सांगण्यात येत आहे.