Pathaan : 'बेशरम रंग' नंतर शाहरुख खाणच्या पठाणमधील 'हे' गाणं प्रदर्शित, पाहा Video

Shahrukh Khan च्या पठाण चित्रपटातील 'हे' नवीन गाणं सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. बेशरम रंग गाण्यानंतर 'या' गाण्यानं सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. 

Updated: Dec 22, 2022, 03:31 PM IST
Pathaan : 'बेशरम रंग' नंतर शाहरुख खाणच्या पठाणमधील 'हे' गाणं प्रदर्शित, पाहा Video  title=

Pathaan New Song Released : बॉलिवूडचा किंग खान अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. सध्या शाहरुख हा 'पठाण' (Pathaan)  चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. दरम्यान, चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असलेला शाहरुख हा चित्रपटातील 'बेशरम रंग' (Besharam Rang) गाण्यात दीपिका पदुकोणनं (Deepika Padukone) परिधान केलेल्या भगव्या बिकिनीमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. अनेक धार्मिक संघटनांचे लोक यावर आक्षेप घेत गाण्यातील काही सीन हटवण्याची मागणी करत आहेत. तर दुसरीकडे चिपटातील आणखी एक गाणं प्रदर्शित झालं आहे. या गाण्याचं नाव 'झूमे जो पठाण' (Jhoome Jo Pathan) असं आहे. 

झूम जो पठाण या गाण्यात देखील शाहरुख आणि दीपिका दिसत आहेत. 'झूमे जो पठाण' हे गाणं बॉलिवूडचा लोकप्रिय प्लेबॅक सिंगर अरिजीत सिंगनं गायलं आहे. या गाण्यात शाहरुख खूपच कूल लूकमध्ये दिसत आहे. तर दीपिकाचा बोल्ड लूक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. गाणं प्रदर्शित होण्याआधीच या गाण्याला पसंती मिळाली होती आणि आता हे गाणं सोशल मीडियावर चांगल ट्रेंड करत आहे. इतकंच काय तर गाण्याबद्दल असलेली प्रेक्षकांना उत्सुकता पाहायला मिळत होती. 

हेही वाचा : अभिनेता Shahrukh Khan चा मुलगा आर्यन खान ड्रग्स प्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात; मुंबई उच्च न्यायालयने निर्णय सुनावल्यानंतर...

अरिजीत सिंगनं गायलेलं हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे. अरिजीतनं शाहरुखसाठी गायलेलं हे पहिलं गाणं नाही तर या आधी देखील अनेक गाणी गायली आहेत. 'दिलवाले' या चित्रपटातील 'गेरुआ' आणि 'जब हॅरी मेट सेजल'मधील 'हवाएं' शाहरुखची ही गाणी अरिजीतनं गायली होती. इतकंच काय तर अरिजीतनं गायलेली ही दोन्ही गाणी हिट ठरली होती. त्यामुळे आता 'झूमे जो पठाण' हे गाण देखील हिट ठरेल अशी अपेक्षा निर्मात्यांना आहे. अरिजीतसोबत हे गाणं सुकृती कक्कर, विशाल आणि शेखर यांनी गायलं आहे. दरम्यान, या गाण्याला विशाल-शेखरने संगीतबद्ध केले आहे. हा चित्रपट 25 जानेवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. 

काय आहे नक्की वाद 

'बेशरम रंग' गाण्यात दीपिकानं परिधान केलेल्या भगव्या बिकिनीवरून हा वाद सुरु झाला आहे. या वादात अनेक मंत्री, अभिनेते आणि अभिनेत्री प्रतिक्रिया देत असताना अयोध्येतील जगद्गुरू आणि तपस्वी छावणीचे संत परमहंस आचार्य (Sant Paramhans Acharya) यांनी शाहरुख खानला धमकी दिली आहे. शाहरुख खान भेटला तर त्याला जिवंत जाळेन अशी धमकी देण्यात आलीय.भाजपच्या मंत्र्यांसह विश्व हिंदू परिषदेने (विहिप) तीव्र विरोध दर्शवला असून त्यात बदल करण्याची मागणी केली आहे. तर इतर पक्षांचे नेते आता सिनेमा आणि सिनेमातील कलाकारांना पाठिंबा देताना दिसत आहेत.