मुंबईः KGF2 ने बॉक्स ऑफिसवर दमदार ओपनिंग केलं आहे. भारतात सर्व व्हर्जन्सने मिळून एकूण 134 कोटींचा गल्ला कमावला आहे इतकंच काय तर फक्त KGF हिंदीने 54 कोटींसह खातं खोललं आहे. सोशल मीडियावरही KGFच्याच यशचा बोलबाला आहे. यश आता कन्नडसह भारतातल्या तरुणाईच्या चर्चेचा विषय बनलाय. सिनेप्रेक्षकांमध्ये यशचाच फिव्हर आहे. रॉकीच्या दमदार ऍक्टिंगमुळे मोठ-मोठ्या अभिनेत्यांना तर घाम फुटला आहे. KGFचा रॉकी भाई आता सर्वांचाच भाई बनलाय.देश-परदेशातून चाहत्यांचं प्रेम रॉकीला मिळतंय.
सिल्वर स्क्रीनवर रॉकी भाई बनून यशने रेकॉर्डतोड कमाई केली आहे. मात्र आज हे 'यश' दिसत असलं तरी काही वर्षांपूर्वी 'रॉकी' साकारणाऱ्या यशला मोठ्या अपयशाचा सामना करावा लागता होता.
चाहते आणि समीक्षकांनी KGF2च्या यशला फुल मार्क्स दिले असले तरी एक वेळ अशी होती जिथे 'रॉकी' बॉक्स ऑफिसवर सपशेल अपयशी ठरला होता. यशचा 2008मध्ये एक सिनेमा प्रदर्शित झाला होता त्या सिनेमाचं नाव होतं रॉकी.
2008मध्ये आलेल्या रॉकी सिनेमात अभिनेता यशनं 'रॉकी' हे पात्र साकारलं होतं. मात्र, हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर काहीही कमाल दाखवू शकला नाही. सिनेसमीक्षकांच्या पसंतीस हा सिनेमा उतरू शकला नाही ज्याचा परिणाम या सिनेमाच्या कमाईवर झाला. या सिनेमाचं बजेट होतं 5 कोटींचं. ट्रँगल लव्हस्टोरी असलेला रॉकी सिनेमा न चालल्याने निर्मात्यांचं मोठं नुकसान झालं होतं.
2008मध्ये रॉकी बनून अपयश मिळालं असलं तरी KGF2 च्या माध्यमातून यशने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे आणि त्याच्या भूमिकेचाच सध्या सर्वत्र बोलबाला आहे