लग्नाआधीची katrina kaif ची दिवाळी vicky kaushal मुळे स्पेशल !

 विकी कौशल आणि कतरिना कैफ यांच्या लग्नाच्या बातम्या सध्या चांगल्याच चर्चेत आहेत

Updated: Nov 5, 2021, 01:35 PM IST
लग्नाआधीची katrina kaif ची दिवाळी vicky kaushal मुळे स्पेशल ! title=

मुंबई : विकी कौशल आणि कतरिना कैफ यांच्या लग्नाच्या बातम्या सध्या चांगल्याच चर्चेत आहेत. असे मानले जात आहे की, दोघे डिसेंबरमध्ये लग्न करणार आहेत. लग्नाच्या ठिकाणापासून तारखेपर्यंत सर्वच गोष्टींबाबत खुलासे होत आहेत. दरम्यान, नुकतेच हे दोघेही दिवाळी पार्टीत दिसले. 

विकी आणि कतरिनाने वेगळ्या कारमधून आरती शेट्टीच्या दिवाळी पार्टीला हजेरी लावली. यावेळी कतरिनाने गुलाबी रंगाची साडी परिधान केली होती. तर तिथे विकी कौशल गडद निळ्या रंगाचा कुर्ता घालून पोहोचला होता.

कटरीना कैफ-विक्की कौशल

विकी कौशलने पापाराझींना शुभेच्छा दिल्या. त्याचवेळी कतरिनानेही गोड स्माईल दिली.

कटरीना कैफ-विक्की कौशल

लग्नाच्या बातम्यांबद्दल बोलायचे झाले तर कतरिना कैफचा लग्नाचा पोशाख सब्यसाची बनवणार आहेत. काही दिवसांपूर्वी कतरिनाची आई आणि बहीण इसाबेल शॉपिंग करताना दिसल्या होत्या.

कटरीना कैफ-विक्की कौशल

कतरिना आणि विकी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात लग्न करणार आहेत. लग्नापूर्वी दोघेही दिवाळी पार्टी करण्यासाठी आले होते. लग्नाची बातमी खरी ठरली तर दोघांची लग्नापूर्वीची ही शेवटची दिवाळी असणार आहे.

पार्टीनंतर कतरिनाने तिची आई सुझान टर्कोटे आणि धाकटी बहीण इसाबेल कैफसोबतचा एक फोटो शेअर केला. या फोटोत तिघेही खूप सुंदर दिसत आहेत.विकी कौशलने चाहत्यांना शुभेच्छा देताना स्वतःचा एक फोटोही शेअर केला आहे. या फोटोत त्याने स्काय ब्लू रंगाचा कुर्ता परिधान केला होता.