'26 वर्ष लहान पत्नीपेक्षा अधिक...', मिलिंद सोमनचे बेडरुम सिक्रेट समोर

'26 वर्ष लहान पत्नीपेक्षा अधिक...', बेडरुम सिक्रेट सांगताना मिलिंद सोमणचा मोठा खुलासा  

Updated: Jun 27, 2022, 09:17 AM IST
'26 वर्ष लहान पत्नीपेक्षा अधिक...', मिलिंद सोमनचे बेडरुम सिक्रेट समोर title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता मिलिंद सोमण कायम त्याच्या फिटनेसमुळे चर्चेत असतो. वयाच्या 56 व्या वर्षी मिलिंद अनेकांना फिट राहण्यासाठी प्रेरणा देत असतो. फक्त मिलिंदचं नाही तर त्याची आई आणि पत्नी देखील प्रचंड फिटनेस फ्रिक आहेत. त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. आता देखील मिलिंद एका मोठ्या वक्तव्यामुळे चर्चेत आला आहे. मिलिंदने यावेळी त्याच्या बेडरुम सिक्रेटबद्दल सांगितलं आहे. 

सेक्स ड्राइव्हवर मिलिंदचं वक्तव्य
एका मुलाखतीत मिलिंदने त्याच्या सेक्स ड्राईव्हबद्दल सांगितलं आहे. अभिनेता म्हणाला, 'क्वचितच लोक मला आमच्या सेक्स ड्राइव्हबद्दल प्रश्न विचारतात. हे अगदी सामान्य आहे. कारण आजही मी स्वतःला तिच्याच वयाचा समजतो. शारीरिकदृष्ट्या मी पत्नीपेक्षा अधिक फिट असल्याचं देखील अभिनेत्याने यावेळी सांगितलं. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

मिलिंद अंकिताची रोमँटिक केमिस्ट्री
मिलिंद सोनम आणि पत्नी यांच्या सोशल मीडिया पोस्टवरून दोघेही फिटनेस फ्रीक असल्याचे दिसून येत. या स्टार कपलच्या वयात 26 वर्षांचा फरक आहे. मिलिंद 56 वर्षांचा आहे, तर त्याची पत्नी अंकिता फक्त 30 वर्षांची आहे. लग्नानंतर देखील त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओे व्हायरल झाले. 

दोघेही सोशल मीडियावर एकमेकांसोबत बोल्ड आणि रोमँटिक फोटो शेअर करत राहतात. एवढंच नाही तर लग्न करताना कोणत्याही गोष्टीची तमा न बाळगता मिलिंद आणि अंकिताने त्यांच्या प्रेमाला प्राधान्य दिलं.