लोकप्रिय कलाकार ज्यांनी जवळपास दोन दशक हिंदी चित्रपटांमध्ये राज्य केलं. चित्रपटातील त्यांच्या डान्स स्टाईलमुळे त्यांना 'ट्विंकल टोस्ट' हा टॅग मिळाला. लाखो चाहत्यांची ही इच्छा होती की या अभिनेत्रीनं त्यांची जीवनसाथी व्हावं. इतकंच नाही तर अनेक विवाहीत अभिनेते देखील या अभिनेत्रीच्या प्रेमात होते. मात्र, तुम्हाला माहित आहे का की या अभिनेत्रीवर आरोप करण्यात आले होते की त्यांनी पतीला खरेदी करत लग्न केलं. तर या अभिनेत्रीनं विवाहीत डॉक्टरशी लग्न केलं होत? आज याच अभिनेत्रीविषयी जाणून घेऊया...
'मैं क्या करूं राम, मुझे बुड्ढा मिल गया', 'मांग के साथ तुम्हारा', 'उड़े जब-जब जुल्फे मेरी...' अशा अनेक गाणी या अभिनेत्रीच्या नावावर आहेत आणि ही अभिनेत्री वैजयंती माला आहे. वैजयंती माला यांचा आज 91 वा वाढदिवस आहे. आता त्या चित्रपटापासून दूर आहेत. पण त्यांचे कधी हिंदी चित्रपटसृष्टीत देखील अनेक प्रेमी होते. कधीकाळी त्यांच्या इतक्या गॉसिप व्हायच्या की त्यांना गॉसिप क्वीन म्हटल्या जायच्या. त्यानंतर एका डॉक्टरसोबत त्यांनी लग्न केलं.
वैजयंती माला यांनी संगम, सूरज, प्रिंस, मधुमति, गंगा जमुना सारख्या चित्रपटांमध्ये दिलीप कुमारसोबत काम केलं. मधुमति आणि गंगा जमुना सारख्या चित्रपटांपुढे जात त्यांच्या भूमिकांसाठी त्या ओळखल्या जात होत्या. जेव्हा कलाकार हे एकमेकांसोबत काम करतात आणि त्यांच्या देखील चर्चा होतात. वैजयंती माला यांच्यासोबत देखील असचं झालं.
वैजयंती माला आणि दिलीप कुमार यांची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. रिपोर्ट्सनुसार, 1961 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'गंगा-जमुना' च्या सेटवर दोघांमध्ये जवळीकता वाढल्याचे म्हटले जाते. त्यावरून अनेकांनी अनेक गोष्टी या सुनावल्या. पण ही जोडी अयशस्वी ठरली आणि हे नातं तुटलं. त्यामागचं कारण हे वैजयंती माला या अधिक महत्त्वाकांक्षी होत्या हे होतं. खरं तर, त्यांना आरके कॅम्पकडून चित्रपटाची ऑफर आली, जी त्या नाकारू शकल्या नाही आणि दिलीप साहेबांच्या विरोधाला न जुमानता त्या आरके कॅम्पमध्ये गेल्या.
राज कपूर यांच्या वैजयंती मालासोबतच्या अफेअरची बातमी त्यांची पत्नी कृष्णा कपूर यांच्या कळली. तेव्हा कुटुंबात खळबळ उडाली. वैजयंती माला यांनी राज कपूरसोबत 'संगम' चित्रपटात काम केलं होतं. ज्यामध्ये दोघांची रोमँटिक केमिस्ट्री लोकांना खूप आवडली होती. शूटिंगदरम्यान दोघेही एकमेकांच्या खूप जवळ आले. यामुळे राजची पत्नी कृष्णा इतकी नाराज झाली की, ती मुलांना घेऊन नटराज हॉटेलमध्ये राहू लागली. राज साहेबांनी पत्नीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, असं म्हणतात की मग कृष्णा यांनी त्यांच्या पतीसमोर एक अट ठेवली. वैजयंती मालासोबत मी कधीही काम करणार नाही आणि कोणतेही नातेही ठेवणार नसल्याचे त्यांनी सांगितले. राज कपूर यांना पत्नीच्या या अवस्थेपुढे नतमस्तक व्हावे लागले आणि त्यामुळे दोघेही वेगळे झाले. याचा उल्लेख ऋषी कपूर यांच्या 'खुल्लम खुल्ला' या पुस्तकात करण्यात आला आहे.
हेही वाचा : KBC 16 च्या एका एपिसोडसाठी अमिताभ बच्चन 3-4 कोटी नाही तर घेतात तब्बल इतके कोटी!
रिपोर्ट्सनुसार, एका चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान डल झीलमध्ये बराचवेळी शूट केल्यानंतर वैजयंती माला यांना निमोनिया झाला होता. तेव्हा राज कपूर यांचे फॅमिली डॉक्टर चमन बाली यांनी त्यांचे उपचार केले आणि मग त्यांच्यात प्रेम झालं आणि त्यांनी लग्न केलं. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डॉक्टर हे आधीच विवाहीत होते. दरम्यान, असं म्हटलं जातं की डॉक्टरांच्या पत्नीनं घटस्फोट घेण्यासाठी खूप मोठी रक्कम मागितली होती. मागितलेली रक्कम ही देऊ शकत नाही असं त्यांनी वैजयंती माला यांना सांगितलं. तेव्हा वैजयंती माला यांनी पोटगीची ती रक्कम दिल्याचे म्हटले जाते. तर त्या दोघांचा घटस्फोट झाल्यानंतर वैजयंती माला आणि चमन बाली यांनी लग्न केलं. त्यांच्या लग्नात चित्रपटसृष्टीतील बडे सेलिब्रिटी आले होते. पण राज कपूर यांना या लग्नापासून दूर ठेवण्यात आलं होतं.