Badhaai Ho Trailer : आयुष्मान सिनेमाचा अफलातून ट्रेलर

अफलातून ट्रेलर

मुंबई : बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना आणि दंगल गर्ल सान्या मल्होत्रा असलेल्या स्टाररचा 'बधाई हो' या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. जंगली पिक्चर्सद्वारे बधाई हो या सिनेमाची निर्मिती झाली असून याचा ट्रेलर अतिशय मजेदार आहे. या सिनेमाची गोष्ट अगदीच वेगळी आहे. दिग्दर्शक अमित शर्माचा हा अगदी फॅमिली ड्रामा आहे. 

2 मिनिटं 43 सेकंज असलेल्या या ट्रेलरची सुरूवात एका डायलॉगने होते. घर में मेहमान आले वाला है.... हा डायलॉग काही नवीन नाही मात्र या सिनेमात त्याचा वेगळा अर्थ आहे. आयुष्मान खुरानाची आई पुन्हा एकदा गरोदर असल्याचं कळतं. आणि संपूर्ण कुटुंब यासगळ्याकडे कसं बघतो हे पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे.  

'शुभ मंगल सावधान' आणि 'बरेली की बर्फी' सारख्या शानदार सिनेमानंतर आयुष्मान हा सिनेमा घेऊन आला आहे. हा सिनेमा 19 ऑक्टोबर 2018 मध्ये प्रदर्शित होत आहे. या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.