Baba Siddique Murder Case : 12 ऑक्टोबर रोजी रात्र 9.30 च्या आसपास एनसीपी नेता बाबा सिद्दीकी यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर सगळ्यांना मोठा धक्का बसला आहे. बाबा सिद्दीकी यांच्या जवळच्या लोकांनी लगेच त्यांच्या घरच्यांची भेट घेतली. यात खान कुटुंब सगळ्यात पुढे होतं. सलमान खान, सोहेल खान, पूजा भट्ट, यूलिया वंतूर, अर्पिता खान, मन्नारा चोप्रा सारख्या सेलिब्रिटी यावेळी दिसले. मात्र, शाहरुख खान कुठेही दिसला नाही. आता सोशल मीडियावर यावरून चांगलीच चर्चा रंगली आहे. शाहरुख खान हा बाबा सिद्दीकी यांच्या जवळच्या लोकांपैकी एक आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत तो त्यांच्या घरी का नाही गेला.
बाबा सिद्दीकी यांच्या अंत्यविधीत शाहरुख खानची अनुपस्थिती लोकांना खटकली आहे. जिथे बॉलिवूडचे जवळपास सगळे सेलिब्रिटी पोहोचले होते. तर बाबा सिद्दीकी यांच्याशी जवळचे संबंध असणारा शाहरुख खानची अनुपस्थिती सगळ्यांच्या नजरेत दिसून येत आहे. आता शाहरुख खानच्या एका जवळच्या व्यक्तीनं Zoom ला मुलाखत दिली.
शाहरुख खान हा फोटोग्राफरच्या प्रेयर मीट पासून फराह खानच्या आईच्या फ्युनरलपर्यंत सगळ्या कार्यक्रमांमध्ये पोहोचला होता. आता बाबा सिद्दीकी यांच्या अंत्य ते स्वत: ला लांब ठेवण्यामुळे वाद सुरु झाला आहे. खरंतर, या घटनेनंतर शाहरुखच्या टीमशी संपर्क करण्याचा अनेकदा प्रयत्न करण्यात आला. तर शाहरुख आणि बाबा सिद्दीकी यांच्या जवळच्या व्यक्तीशी बोलण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी या प्रकरणात मौन बाळगणं योग्य ठरवलं आहे.
हेही वाचा : 'वडिलांच्या पहिल्या पत्नीच्या निधनानंतर...', अमिताभ यांनी पहिल्यांदाच सौडलं मौन
दरम्यान, असं म्हटलं जात आहे की हा एक मर्डर असल्यानं शाहरुख खानला स्वत: ला या सगळ्या प्रकरणापासून लांब ठेवायचं आहे. इतकंच नाही तर त्याची इच्छा नाही की या प्रकरणात त्याचं नाव घेण्यात यावं. हे प्रकरण सलमान खानशी संबंधीत देखील आहे आणि त्यामुळेच शाहरुखला या सगळ्या प्रकरणापासून लांब राहायचं आहे. लॉरेन्स बिश्नोईची काम करण्याची पद्धत त्यांना माहित आहे. त्यामुळे त्यानं बाबा सिद्दीकी यांच्या अंत्यविधीत सहभागी न होत या सगळ्यापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला.