'हिरो तुझ्या कंबरेवर चपात्या...', दाक्षिणात्य दिग्दर्शकाने मल्लिका शेरावतकडे केली होती विचित्र मागणी, अभिनेत्रीचा खुलासा

मल्लिका शेरावतने साउथ फिल्म इंडस्ट्रीबद्दल एक मोठा खुलासा केला आहे. एका दिग्दर्शकाने तिला एक सीन करायला सांगितला होता. ज्यामध्ये तिला अशी मागणी केली होती की तिलाही मोठा धक्का बसला होता. 

सोनेश्वर पाटील | Updated: Oct 15, 2024, 02:49 PM IST
'हिरो तुझ्या कंबरेवर चपात्या...', दाक्षिणात्य दिग्दर्शकाने मल्लिका शेरावतकडे केली होती विचित्र मागणी, अभिनेत्रीचा खुलासा title=

Mallika Sherawat : बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावत ही 90 च्या दशकातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक आहे. सध्या ती 'विकी विद्या का वो वाला व्हिडीओ' या चित्रपटामुळे सोशल मीडियावर जास्त चर्चेत आहे. मल्लिका अनेक दिवसांनंतर या चित्रपटात दिसली आहे. या चित्रपटात तिची आणि अभिनेता विजय राज यांच्यातील केमिस्ट्री दाखवण्यात आली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राज शांडिल्य यांनी केले आहे. याआधी देखील तिने 'मर्डर' या चित्रपटात काम केलं आहे. यामध्ये ती इमरान हाशमीसोबतच्या इंटीमेट सीनमुळे खूप चर्चेत होती. 

अशातच आता अभिनेत्री मल्लिका शेरावतने साउथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करण्याचा अनुभव शेअर केला आहे. अभिनेत्रीला दिग्दर्शकाने एक मागणी केली होती. ज्यामध्ये तिला देखील मोठा धक्का बसला होता. 

दिग्दर्शकाने केली होती विचित्र मागणी

वास्तविक, मल्लिका शेरावतने काही दिवसांपूर्वीच हॉटरफ्लायशी संवाद साधला होता. यामध्ये तिने साउथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करण्याचा अनुभव शेअर केला आहे. अभिनेत्रीने सांगितले की, ती एका गाण्यासाठी शूटिंग करत होती. ज्यामध्ये एका दिग्दर्शकाने तिला सांगितले होते की, अभिनेत्री किती हॉट आहे हे पहायचे आहे. यावर अभिनेत्रीने त्याला सांगितले की ते ठीक आहे. मग नायक तिच्या कंबरेवर भाकरी भाजणार हे दृश्य त्यांना समोरून समजावून सांगण्यात आले. 

दिग्दर्शकाच्या मागणीला मल्लिकाने दिला होता नकार

हाच मुद्दा पुढे करत मल्लिका शेरावत म्हणाली की, दिग्दर्शकाला मी किती हॉट आहे हे दाखवायचे होते. दिग्दर्शकाने तो सीनही अतिशय महत्त्वाचा असल्याचे सांगितले होते. मात्र, त्यानंतर मल्लिका शेरावतने हा सीन करण्यास नकार दिला. कारण ते तिच्यासाठी योग्य नव्हते. 

त्यासोबतच बॉलिवूड इंडस्ट्रीचा पर्दाफाश करताना अभिनेत्री मल्लिका शेरावत म्हणाली की, इथे चित्रपट मिळवण्यासाठी लोकांना पुढे पुढे करावं लागतं. मल्लिका म्हणते की ती लोकांच्या पुढे पुढे करू शकत नाही आणि त्यासाठी ती तयार पण नाही.