'बधाई' सिनेमाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी महत्वाची बातमी

काय आहे कारण?. 

'बधाई' सिनेमाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी महत्वाची बातमी  title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना आणि अभिनेत्री सान्या मल्होत्राचा आगामी सिनेमा 'बधाई हो' रिलीजच्या अगोदरच खूप चर्चेत आहे. आयुष्मानच्या चाहत्यांबरोबरच अनेक सिनेचाहते या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या सिनेमाची संपूर्ण स्टार कास्ट आता प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. आता या सिनेमासंदर्भात सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. 'बधाई हो' या सिनेमाची रिलीज डेट बदलण्यात आली आहे. 

सगळ्यांना माहित आहे की, 'बधाई हो' या सिनेमाची 19 ऑक्टोबर रोजी रिलीज होणार होत होता. मात्र आता मेकर्सने खूप मोठा निर्णय घेतला आहे. 18 ऑक्टोबर हा सिनेमा रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. याची माहिती ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्शने दिली आहे. अद्याप रिलीज डेट बदलण्याचं कारण समोर आळेलं नाही. 

10 ऑक्टोबरला आयुष्मान खुराना आणि निर्मात्यांनी मुंबईतील 50 प्रेग्नेंट महिलांच्या बेबी शॉवरचा कार्यक्रम आयोजित केला होता. या सिनेमाला आता खूप चांगला रिस्पॉन्स मिळत आहे. तसेच आता प्रेक्षक या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत.