कोरोनामुळे आयुषमान खुरानाने गमावली जवळची व्यक्ती

कोरोना व्हायरसने सर्वत्र हाहाकार माजवला आहे. अनेकांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावलं आहे. 

Updated: Jun 5, 2021, 10:24 AM IST
कोरोनामुळे आयुषमान खुरानाने गमावली जवळची व्यक्ती title=

मुंबई : कोरोना व्हायरसने सर्वत्र हाहाकार माजवला आहे. अनेकांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावलं आहे. फक्त सर्वसामान्य नाही तर अनेक सेलिब्रिटींनाही कोरोनाचा फटका बसला आहे. अनेक प्रसिद्ध कलाकारांचा या एका अदृश्य विषाणूमुळे मृत्यू झाला आहे. आता अभिनेता आणि गायक आयुषमान खुराना स्टारर 'ड्रीम गर्ल' चित्रटातील अभिनेत्रीचं कोरोनामुळे निधन झालं आहे. कोरोनामुळे निधन झालेल्या आयुषमानच्या अभिनेत्रीचं नाव रिंकू सिंह निकुंभ असं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 

रिंकूच्या निधनाची बातमी रिंकूच्या बहिणीने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. चंदा यांनी दिलेल्या माहितीनुसार, 25 मे रोजी रिंकूची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली होती. त्यामुळे तिला घरातचं आयोलेशनमध्ये ठेवलं होतं. पण प्रकृती अधिक बिघडल्यामुळे रिंकूला रूग्णालयात दाखल करण्यात आलं. रिंकूला अस्थमा देखील होता. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

रिंकूने कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस देखील घेतला. रिंकू लवकरचं गोव्यात शुटिंगसाठी जाणार होती पण तिला कुटुंबाने जाण्यास नकार दिला. तिला घरातचं कोरोना झाला. असं देखील रिंकूची बहिण म्हणाली. रिंकू 'हॅलो चार्ली' या चित्रपटाच्या माध्यमातून देखील चाहत्यांच्या भेटीसं आली. 

चित्रपटात रिंकू अभिनेत  जॅकी श्रॉफ आणि आदर जैन देखील मुख्य भूमिकेत दिसले होते. पण हा चित्रपट तिचा अखेरचा चित्रत्रपट ठरला. 'हॅलो चार्ली'या चित्रपटांशिवाय  'चिडीयाघर' आणि 'मेरी हानिकारक बीवी' या लोकप्रिय सीरिजमध्ये देखील काम केलं आहे.