कोणी साकारला अल्लू अर्जुनला टक्कर देणारा नवा Pushpa ? पाहून विश्वास बसणार नाही

पाहा मुख्य भूमिकेत झळकणारा हा सेलिब्रिटी कोण...   

Updated: Jan 26, 2022, 01:19 PM IST
कोणी साकारला अल्लू अर्जुनला टक्कर देणारा नवा Pushpa ? पाहून विश्वास बसणार नाही  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : अभिनेता अल्लू अर्जुन याची मुख्य भूमिका असणाऱ्या पुष्पा (Pushpa)या चित्रपटानं आतापरपर्यंत सर्वांनाच वेड लावलंय. त्याची स्टाईल, चित्रपटातील डान्स स्टेप, हे सगळंच आता ट्रेंड होऊ लागलं आहे. दर दिवशी असंख्य सोशल मीडिया युजर्स या चित्रपटाशी संबंधित रील्स बनवताना दिसत आहेत. 

'पुष्पा'प्रती असणाऱ्या याच प्रेमात भर म्हणजे, आता चित्रपटाच्या पुढील भागाचीही उत्सुकता चाहत्यांना लागून राहिलेली आहे. 

आता म्हणे या प्रेमाला टक्कर देण्यासाठी आणखी एक पुष्पा (Pushpa)प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे आणि तोसुद्धा सर्वांचीच  मनंही जिंकत आहे. 

'मी सुद्धा पुष्पा असतो तर.... अल्लू अर्जुननं अभिनय किती सोपा असतो हेच त्याच्या अभिनयातून दाखवून दिलंय', असं कॅप्शन लिहित या नव्या 'पुष्पा'नं त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर आणला आहे. 

अल्लू अर्जुनच्या अभिनयाला दाद देत आपल्यावर असणाऱी या चित्रपटाची छाप नेमकी कशा पद्धतीनं उमटलीये हे दाखवून देणारा हा सेलिब्रिटी आहे, ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नर.

भारतीय चित्रपटांप्रती डेव्हिडचं प्रेम काही औरच. पण, पुष्पा (Pushpa)साठी मात्र त्याचं विशेष प्रेम, हेच त्याचा हा व्हिडीओ पाहून लक्षात येत आहे. 

काय मग, तुम्हाला हा ऑस्ट्रेलियन 'पुष्पा ' आवडला ना?