हुश्श्श... बहुप्रतिक्षित Asur Season 2 चा फर्स्ट लूक जारी; 'या' दिवशी होणार रिलीज!

Asur Season 2: असुरांच्या उत्पत्तीपासून ते त्यांच्या अस्तित्वापर्यंतची कथा मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे आता 'असुर सीझन 2' या वेब सीरिजसाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Updated: May 25, 2023, 12:25 AM IST
हुश्श्श... बहुप्रतिक्षित Asur Season 2 चा फर्स्ट लूक जारी; 'या' दिवशी होणार रिलीज! title=
Asur season 2

Asur Season 2 First Look: विज्ञान आणि धर्म यांची सांगड घालणारी वेब सीरिज म्हणजे असुर. असुरच्या पहिल्या सिझनने (Asur: Welcome to Your Dark Side) धुमाकूळ घातला होता. त्यानंतर आता 'असुर सीझन 2' या वेब सीरिजचा (Asur season 2) फर्स्ट लूक रिलीज झाला आहे. अर्शद वारसी (Arshad Warsi) आणि बरुण सोबती (Barun Sobti) यांच्या भन्नाट कलाकारीची झलक या वेब सीरिजमध्ये दिसून येते. पहिल्या सीरिज जिथं थांबली तिथूनच या सीरिजचा पुढचा भाग सुरू होईल. त्यामुळे आता प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

असुरांच्या उत्पत्तीपासून ते त्यांच्या अस्तित्वापर्यंतची कथा मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. असुर सिरीयल किलर बनून लोकांना मारताना दिसतोय. तर अर्शद वारसी राक्षसाला पकडण्यासाठी जीवाचं रान करतो. सीरिजच्या दुसऱ्या भागातही तुम्हाला फॉरेन्सिक तज्ज्ञ निखिल आणि सीबीआय अधिकारी धनंजय राजपूत (Dhananjay Rajput) यांच्यातील मतभेद दिसून येतील.

रिद्धी डोगराने इंस्टाग्रामच्या अधिकृत अकाऊंटवर 'असुर सीझन 2' चा फर्स्ट लूक शेअर (Asur Season 2 First Look) केला आहे. "तुमची प्रतिक्षा आता संपली आहे. तुमच्यासाठी मोस्ट अवेटेड 'असुर सीझन 2' चा फर्स्ट लुक सादर करत आहे.", असं म्हणत त्यांनी रिलीजची तारीख (Asur 2 Release Date) देखील जाहीर केलीये. येत्या 1 जूनला जिओ सिनेमावर (JIO Cinema) ही सीरिज पाहता येणार आहे.

पाहा Video

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ridhi Dogra (@iridhidogra)

दरम्यान, वेब सीरिजच्या दुसऱ्या सिझनमध्ये अर्शद वारसी, वरुण सोबती, रिद्धी डोग्रा आणि अनुप्रिया गोएंका हे कलाकार मुख्य भूमिकांमध्ये आहेत. या सीरिजमध्ये अमेय वाघ (Amey Wagh) याची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात आहे. नेमका असुर कोण? या प्रश्नाचं स्पष्ट अजूनही मिळालं नाही. सायबर एक्सपर्ट असलेला अमेय वाघ म्हणजेच रसुल शेख नक्की कोण आहे? याचं उत्तर या भागात मिळणार आहे.

दरम्यान, 'असुर' ही हिंदू पौराणिक कथा आणि हत्या यांच्याशी संबंधित वेब सीरिज आहे. ज्यामध्ये फॉरेन्सिक टीम सीरियल किलरचा शोध घेत आहे. या वेब सीरिजमध्ये अर्शद वारसीही वेगळ्या अंदाजात दिसला होता. क्राइम-थ्रिलर मालिकेत अर्शदने धनंजय राजपूतची भूमिका साकारली होती. 2020 साली पहिला सिझन रिलीज झाला होता. त्यानंतर आता 3 वर्षांनी याचा दुसरा सिझन येतोय.