अश्मित पटेलने स्पेनमध्ये या अभिनेत्रीला घातली मागणी !

एके काळी रिया सेन आणि अस्मित पटेल यांच्यामध्ये अफेअर चालू असल्याची चर्चा होती.

Updated: Aug 19, 2017, 02:22 PM IST
अश्मित पटेलने स्पेनमध्ये या अभिनेत्रीला घातली मागणी !  title=

  मुंबई : एके काळी रिया सेन आणि अस्मित पटेल यांच्यामध्ये अफेअर चालू असल्याची चर्चा होती.

मात्र काही दिवसांपूर्वीच रिया सेन लग्नबंधनात अडकली आणि आता अश्मित पटेलही एन्गेज्ड झाल्याची माहिती त्याने ट्विटरवरून दिली आहे. 

अश्मित पटेल आणि महेक चलक यांनी स्पेनमध्ये साखरपुडा केला आहे. काही वर्षांपूर्वी बिग बॉगमध्ये या दोघांची ओळख झाली.  महेक आणि अश्मित दोघेही त्यांच्या कुटुंबासमोर युरोपमध्ये फिरायला आले होते. यादरम्यान अश्मितने  महेकला लग्नासाठी विचारले. महेकने होकार दिल्यानंतर तिच्या बोटात रिंग घालून एकमेकांची लाईफ पार्टनर म्हणून निवड केली. 

मिडीया रिपोर्टनुसार,अश्मितने  महेकला स्पेनमध्ये एका रेस्ट्रॉरंटमध्ये मागणी घातली. गुडघ्यावर बसून फिल्मी स्टाईलमध्ये तिच्या बोटात अंगठी घातली. या खास प्रसंगाचा एक फोटोदेखील त्याने ट्विटरवर अपलोड केला आहे. 

 

अश्मितचे नाव यापूर्वी वीणा मलिक आणि रिया सेन सोबतही जोडले गेले होते. अश्मित आणि रियाचा एक एमएमएसदेखील इंतरनेटवर व्हायरल झाला होता. या व्हिडिओला दोघांनीही बनावट असल्याचे म्हटले होते.