विराट राहिला बाजुला... या 'श्रीलंकन' खेळाडूनं अनुष्कावर प्रेम केलं व्यक्त!

विरुष्काचं ब्रेक अप... पुन्हा पॅच अप... विराटला भेटण्यासाठी अनुष्काचं श्रीलंकेत दाखल होणं... आणि या दरम्यानच एका श्रीलंकन खेळाडूनं अनुष्काप्रती आपलं प्रेम व्यक्त करणं... यामुळे विरुष्काचे फॅन्सला आश्चर्य न झालं तरच नवल! 

Updated: Aug 19, 2017, 01:39 PM IST
विराट राहिला बाजुला... या 'श्रीलंकन' खेळाडूनं अनुष्कावर प्रेम केलं व्यक्त! title=

नवी दिल्ली : विरुष्काचं ब्रेक अप... पुन्हा पॅच अप... विराटला भेटण्यासाठी अनुष्काचं श्रीलंकेत दाखल होणं... आणि या दरम्यानच एका श्रीलंकन खेळाडूनं अनुष्काप्रती आपलं प्रेम व्यक्त करणं... यामुळे विरुष्काचे फॅन्सला आश्चर्य न झालं तरच नवल! 

भारत विरुद्ध श्रीलंका टेस्ट सीरीज जिंकल्यानंतर टीम इंडिया चांगल्याच रिलॅक्स मूडमध्ये आहे. टीम इंडियाचे खेळाडू आपले कुटुंबीय आणि मित्र-मैत्रिणींबरोबर वेळ व्यतीत करताना दिसतायत.

श्रीलंका टेस्ट सीरीज घशात घातल्यानंतर कॅप्टन विराट कोहलीवर अभिनंदनाचा वर्षाव होतोय. विराटच्या या आनंदात सहभागी होण्यासाठी अभिनेत्री अनुष्का शर्माही श्रीलंकेत दाखल झालीय. त्यानंतर विराट आणि अनुष्काचा फोटो सोशल मीडियावर वायरल झालेला पाहायला मिळाला. 

त्यानंतर मात्र एका श्रीलंकन खेळाडूनं सोशल मीडियावर अनुष्कासोबत शेअर केलेल्या फोटोनं अनेकांचं लक्ष वेधून घेतलं. या श्रीलंकन खेळाडूनं अनुष्का शर्मा आपलं 'क्रश' असल्याचं म्हटलंय... हा श्रीलंकन खेळाडू आहे बॅटसमन चमारा कपुगेदरा... नेट सेशननंतर अनुष्कासोबत काढलेला सेल्फी चमारानं शेअर केलाय. 

Stunning @anushkasharma #humblesoul #bestinbollywood #celebcrush

A post shared by chamara kapugedara (@ckkapuwa) on