ड्रग्स प्रकरणानंतर शाहरुखने आर्यनसाठी घेतला मोठा निर्णय, लवकरचं 'या' ठिकाणी दिसणार

ड्रग्स प्रकरणानंतर आर्यनचा नवा प्रवास... काही दिवसांपूर्वी तो ऑक्शन दरम्यान दिसला, आता मात्र...  

Updated: Feb 23, 2022, 09:41 AM IST
ड्रग्स प्रकरणानंतर शाहरुखने आर्यनसाठी घेतला मोठा निर्णय, लवकरचं 'या' ठिकाणी दिसणार  title=

मुंबई : अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान काही महिन्यांपूर्वी ड्रग्स प्रकरणी चर्चेत आला. याप्रकरणी आर्यनला अटक देखील करण्यात आली. पण आर्यन आता वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवण्यासाठी तयार झाला आहे. आर्यन त्याच्या करियरला सुरुवात करणार आसल्याचं कळत आहे. आर्यन अभिनेता म्हणून नाही तर लेखक म्हणून कलाविश्वात पाऊल ठेवणार आहे. 

पिंकव्हिलाच्या रिपोर्टनुसार आर्यन फिचर फिल्म आणि वेब सीरिजसाठी लेखन करणार आहे. जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'आर्यन नव्या प्रवासाच्या तयारीत आहे.'

आर्यन दोन ऑमेझॉन प्राईमवरील वेब सीरिज आणि एक फिचर फिल्मसाठी लेखन करणार आहे. आर्यनच्या सीरिज आणि सिनेमाची निर्मिती रेड चिलीज करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

जेव्हा स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मच्या सर्व गरजा पूर्ण होतील तेव्हा सीरिज प्रदर्शित करण्यासाठी ग्रीन सिग्नल मिळेल... एवढंच नाही तर आर्यन लेखक बिलाल सिद्दीकीसोबत मिळून सर्व काम पूर्ण करत असल्याचं कळत आहे. 

दरम्यान, काही दिवसांपूर्वी आर्यन आयपीएक ऑक्शनमध्ये दिसला. ड्रग्स प्रकरणातून बाहेर आल्यानंतर पहिल्यांदा आर्यन सर्वांच्या समोर आला. ऑक्शन दरम्यानचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते.