Arshad Warsi Comment on Prabhas Look From Kalki Movie : दाक्षिणात्य अभिनेता प्रभासच्या कल्कि 2898 एडी या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड बनवले आणि वर्ल्ड वाईड बॉक्स ऑफिसवर तब्बल 1100 कोटींची कमाई केली. दरम्यान, या चित्रपटाला क्रिटिक्सकडून खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला नाही. इतकंच नाही तर प्रेक्षकांनी देखील या चित्रपटाला काही चांगला रिस्पॉन्स दिला नव्हता. अनेकांना हा चित्रपट कंटाळवाणा वाटला. फर्स्ट हाफचं दिग्दर्शन चांगलं नव्हतं असं म्हणत अनेकांनी तक्रार केली. आता बॉलिवूड अभिनेता अरशद वारसीनं प्रभासवर वक्तव्य केलं आहे.
अमिताभ बच्चन, दीपिका पदुकोण आणि कमल हासन सारखे कलाकार ज्या चित्रपटात होते त्याविषयी बोलताना अरशद वारसी म्हणाला, मी कल्कि पाहिला, मला आवडला नाही. मला खूप वाईट वाटतं जेव्हा... अमित जींनी आजवर खूप चांगलं काम केलं. मी त्या माणसाला कधीच समजू शकत नव्हतो. खरंच बोलतोय जर आपल्यात त्या माणसाइतकी ताकद असेल, तर आयुष्यात आपण कुठेच थांबणार नाही. ते अनरियल आहेत.
Here it is, The real view of #Kalki2898AD from north India. #Prabhas looks like Joker in the film says Arshad. He also added kalki could have been a good film like Mad Max but the actor and director failed to do so.
pic.twitter.com/hbEWMOyyj7— Movie Hub (@Its_Movieshub) August 18, 2024
एकीकडे अरशदनं अमिताभ यांची स्तुती केली, तर भैरवाच्या भूमिकेसाठी प्रभासवर ताशेरे ओढले आहेत. अरशद म्हणाला, प्रभास, मला त्याला चित्रपटात पाहून खूप वाईट वाटलं की तो असा जोकर सारखा का दिसत होता? मला त्याला मॅड मॅक्स पाहायचं होतं. मला त्याला मेल गिस्बनसारखं पाहायचं आहे. तुम्ही त्याला काय बनवलं. असं का करता? मला हेच कळत नाही. अरशद वारसीनं यूट्यूबवर समदीश भाटियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की कशा प्रकारे हा चित्रपट टेक्निकली खूप एडवांस चित्रपट असेल आणि चांगली कमाई करूनही हा चित्रपट प्रेक्षकांची मनं जिंकू शकला नाही. दरम्यान, अनेकांनी प्रभासच्या भूमिकेवर आक्षेप घेत म्हटलं होतं की या भूमिकेला योग्य प्रकारे मांडण्यात आलं नाही.
हेही वाचा : बॉलिवूडच्या पार्ट्या कशा असतात? कंगनाने उघड केलं पडद्यामागील काळं सत्य, म्हणाली 'इंडस्ट्रीमधील मित्र...'
अरशद वारसीनं काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या राजकुमार रावच्या 'श्रीकांत' आणि शर्वरी वाघच्या 'मुंज्या' या दोन्ही चित्रपटांवर त्याची प्रतिक्रिया दिली होती. त्यानं 'श्रीकांत' विषयी सांगितलं की 'मी हा चित्रपट पाहिला आणि मला खूप आवडला. मला वाटतं की राजकुमार रावनं उत्तम काम केलं आहे. खूप चांगलं काम केलं आहे.' मुंज्याविषयी अरशदनं सांगितलं की 'मी या चित्रपटाविषयी अनेक सकारात्मक गोष्टी ऐकल्या आहेत. एक नवीन मुलगा आणि शर्वरीसोबत हा छोटा चित्रपट आहे.'