मुंबई : लोकप्रिय पार्श्वगायक अर्जुन कानूनगो (Arjun Kanungo) नुकताच विवाहबंधनात अडकला. लग्नानंतर काही क्षणांनीच या जोडीनं एका पार्टीचं आयोजन केलं होतं. पार्टीसाठी अर्जुन आणि त्याची पत्नी, कार्ला डेनिस (Carla Dennis) ग्लॅमरस लूकमध्ये सर्वांसमोर आले.
पार्टीसाठी अर्जुननं काळ्या रंगाच्या ब्लेझरला पसंती दिली होती. तर, कार्ला आयव्हरी शोडमधील साडीत सर्वांसमोर आली. हातांवर गडद रंग ल्यालेली मेहंदी, चेहऱ्यावर सुरेख हास्य, नववधूचा चेहऱ्यावरून ओसंडून वाहणारा नूर असा तिचा लूक यावेळी पाहायला मिळाला.
कार्लाच्या लूकमध्ये सर्वाधिक चर्चेत येणारी बाब ठरला तो म्हणजे तिनं साडीवर मॅच केलेला ऑफशोल्डर ब्लाऊज. पूर्ण बाह्यांतचा, ऑफ शोल्डर ब्लाऊज कार्ला अतिशय सुरेखपणे कॅरी करताना दिसत होती.
तिच्या या फोटोंवर बऱ्याच कमेंट्स आल्या. काहींना तिचा हा लूक मर्यादा ओलांडणारा वाटला तर काहींनी मात्र या लूकला तिनं ज्या पद्धतीनं कॅरी केलं होतं त्याचं तोंड भरून कौतुक केलं. एखादा फॅशन ट्रेंड फॉलो करण्यापेक्षा तो तुम्ही किती चांगल्या पद्धतीने कॅरी करता हेच कार्लाचे फोटो पाहताना लक्षात आलं.