काम मिळत नसल्यामुळे या प्रसिद्ध अभिनेत्यावर आली मासे विकण्याची वेळ

कलाकारांवर कोरोना आणि लॉकडाऊनचं सावट...

Updated: Jul 5, 2021, 07:02 AM IST
काम  मिळत नसल्यामुळे या प्रसिद्ध अभिनेत्यावर आली मासे विकण्याची वेळ  title=

मुंबई : कोरोना व्हायरसने गेल्या वर्षभरापासून देशातचं नाही तर संपूर्ण जगात थैमान घातलं आहे. कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. आता सर्व गोष्टी हळू-हळू पूर्वपदावर येत असल्या तरी प्रत्येकाचं मोठं नुकसान झालं आहे. फक्त सर्वसामान्य जनतेला नाही तर सेलिब्रिटींना देखील आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागला. अनेक प्रसिद्ध कलाकारांना त्यांचं क्षेत्र सोडून पोटाची भूक आणि गरजा भागवण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करवा लागला. टॉलीवूड (Tollywood) सिनेसृष्टीचा प्रसिद्ध अभिनेता अरिंदम प्रामाणिक (Arindam Pramanik) देखील कोरोनामुळे मासे विकण्याची वेळ आली. 

अरिंदम सांगतो की, 'माझे वडील आधी बर्दवान जिल्ह्यातील मेमारीमध्ये भाज्या विकायचे. पण मला एक प्रसिद्ध अभिनेता व्हायचं होतं. जेव्हा मी अभिनय क्षेत्रात पाय ठेवला तेव्हा माझ्या बाबांनी भाज्या विकण्याचं काम केलं नाही. पण आता पुन्हा माझ्यावर तिचं वेळ आली. अभिनय सोडून कुटुंबासाठी मला त्याच बाजारात मासे विकावे लागत आहेत.'

नहीं मिल रहा काम, एक्टिंग छोड़कर मछलियां बेच रहा ये मशहूर एक्टर

अरिंदम बद्दल सांगायचं झालं तर, त्याने अनेक चित्रपटांमध्ये आणि मालिकांमध्ये मुख्य भूमिका साकारली. पण आता अरिंदम मेमारी बाजारात मासे विकतो. त्याच्याकडे आता मास विकण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. फक्त अरिंदम नाही अनेक कलाकारांनी देखील अभिनय  सोडून दसरी वाट धरली आहे. कोरोनामुळे अनेकांचं नुकसान झालं आहे.