कॉलसेंटरमध्ये काम करणारी 'ही' मध्यमवर्गीय मुलगी आज झालीये प्रसिद्ध अभिनेत्री

या अभिनेत्रीला आज सगळे ओळखतात मात्र, एक काळ असा होता जेव्हा तिनं खूप संघर्ष केलं आहे. 

Updated: Feb 18, 2023, 03:14 PM IST
कॉलसेंटरमध्ये काम करणारी 'ही' मध्यमवर्गीय मुलगी आज झालीये प्रसिद्ध अभिनेत्री title=

Archan Gautam Used To Work For 10 to 20 rupees : छोट्या पडद्यावरील 'बिग बॉस 16' या शोची स्पर्धक आणि अभिनेत्री अर्चना गौतमचे (Archan Gautam) आज लाखो चाहते आहेत. अर्चनानं आजवर शोमध्ये दाखवलेले तिचे गेम प्लॅन पासून तिच्या फनी स्टाईलनं सगळ्यांची मने जिंकली. मराठमोळ्या शिवसोबत सतत भांडली त्यानंतर तिला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला तरी सुद्धा ती शोमध्ये होती. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अर्चनानं तिच्या लहानपणीच्या काही आठवणी सगळ्यांसोबत शेअर केल्या आहेत. 

अर्चनानं नुकतीच सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या एका मुलाखतीत खुलासा केला आहे की 'ती 10-20 रुपयांसाठी लोकांच्या घरी रिकामे सिलिंडर पोहोचवायची. याविषयी बोलताना अर्चना म्हणाली की ' 2007 आणि 2008 मध्ये तिच्या कुटुंबाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागला होता. आर्थिक स्थिती चांगली नव्हती. आता आम्ही काही थोडे लहान नव्हतो. त्यावेळी रिकामे सिलिंडर पोहोचवण्यासाठी मला 10 ते 20 रुपये मिळायचे. मी ते सिलिंडीर सायकल किंवा बाईकवर घेऊन जात होतो. (Archan Gautam Know Details) 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अर्चना पुढे याविषयी सांगताना म्हणाली, “माझी पहिली नोकरी टेलिकॉलिंगची होती. त्यासाठी तिला महिन्याला सहा हजार रुपये मिळत होते. मला इंग्रजी येत नव्हती, त्यामुळे मी फक्त हिंदीत बोलू शकत होते, पण माझा फोन कोणी उचलायचे नाही आणि जर कोणी उचलला तर ते  समोरून डिस्कनेक्ट करायचे. त्यामुळे कोणतीही डील पूर्ण होत नव्हती आणि मग त्यांनी मला कामावरून काढून टाकलं. त्यानंतर मग परत नोकऱ्या करत करत 10 ते 12 हजार रुपयांची नोकरी मिळवली आणि त्यानंतर मी सेटल झाले." 

हेही वाचा : शिवसेना नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदेंना मिळताच मराठमोळा अभिनेता म्हणाला, 'बाळासाहेब पण...'

आज सगळ्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या अर्चनाचा जन्म हा उत्तर प्रदेशातील मेरठ या शहरात झाला होता. अर्चना ही एका मध्यमवर्गीय कुटुंबात मोठी झालेली मुलगी आहे. अर्चनानं रवी किशनसोबत सेल्स का बाजीगरमध्ये काम केले होते. तर 2014 मध्ये ती मिस उत्तर प्रदेश झाली होती. 2018 मध्ये तिने मिस बिकिनीचा खिताब पटकावला होता. त्याच वर्षी अर्चनानं मिस बिकिनी युनिव्हर्समध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले.