'गंगूबाई काठियावाडी’नंतर भन्साळींच्या 'या' वेब सीरीजचा फर्स्ट लूक समोर, देहविक्री करणाऱ्या स्त्रिया....!

Heeramandi First Look : संजय लीला भन्साळी यांच्या आगामी 'हिरामंडी' या वेबसिरीजचा फर्स्ट लूक समोर आला आहे. यामध्ये सोनाक्षी सिन्हापासून आदिती राव हैदरी आणि मनीषा कोईरालापर्यंत सर्वच रॉयल लूकमध्ये दिसत आहेत. हा शो नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

Updated: Feb 18, 2023, 03:11 PM IST
'गंगूबाई काठियावाडी’नंतर भन्साळींच्या 'या' वेब सीरीजचा फर्स्ट लूक समोर, देहविक्री करणाऱ्या स्त्रिया....! title=
Heeramandi First Look

Heeramandi First Look: संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) हे हिंदी चित्रपटसृष्टीतील एक सुप्रसिद्ध मोठे दिग्दर्शक आहेत जे त्यांच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांसाठी ओळखले जातात. चाहते नेहमीच संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटांची वाट पाहत असतात. त्यांचा ‘गंगुबाई काठियावाडी’ (Gangubai Kathiawadi) हा चित्रपट अजूनही ओटीटीवर थिरकत आहे जो लोक अजूनही पाहत आहेत. त्याचवेळी संजय लीला भन्साळींबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे, जी ऐकून चाहत्यांना आनंद होत आहे. 

दरम्यान 'गंगूबाई काठियावाडी'नंतर (Gangubai Kathiawadi) आता बॉलिवूडचे प्रसिद्ध चित्रपट निर्माते संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांनी वेब सीरिजच्या दुनियेत पाऊल टाकलं आहे. त्यांची आगामी वेव सीरिज ‘हीरामंडी’ लवकरच ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. या वेब सीरिजचा फर्स्ट लूक नुकताच प्रदर्शित झाला असून यात सोनाक्षी सिन्हा, मनीषा कोइराला, अदिति राव हैदरी, रिचा चड्ढा, संजीदा शेख आणि शर्मिन सेहगल यांच्या मुख्य भूमिका आहेत. यांच्या या लूकनेच सर्वांना वेड लावले असून सोशल मीडियावर त्याची चर्चा सुरू झाली आहे.

वेब सिरीज नेटफ्लिक्सवर रिलीज होणार

या व्हिडिओच्या सुरुवातीला संजय लीला भन्साळी यांचे नाव दिसत आहे. यानंतर मनीषा कोईराला, अदिती राव हैदरी, शर्मीन सेगल, रिचा चढ्ढा आणि शेवटी सोनाक्षी सिन्हा यांची झलक पाहायला मिळते. सर्वजण पिवळ्या रंगाच्या आउटफिटमध्ये रॉयल लूकमध्ये दिसत आहेत. या वेबसिरीजमध्ये ओटीटीमध्येही पदार्पण करत आहे. यासाठी दिग्दर्शकाने नेटफ्लिक्सशी हातमिळवणी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही वेब सीरिज बनवण्यासाठी मोठी रक्कम गुंतवणार आहे. 
.
दरम्यान संजय लीला भन्साळी पहिल्यांदा वेब सीरिजचं दिग्दर्शक करत आहेत. ‘गंगूबाई काठियावाडी’नंतर ते ‘हीरामंडी’तून देहविक्री करणाऱ्या स्त्रियांची कथा मोठ्या पडद्यावर मांडताना दिसणार आहेत. मात्र ही वेब सीरिज कधी प्रदर्शित होणार याबाबत कोणतीही माहिती अद्याप शेअर करण्यात आलेली नाही.