रिसेप्शनमध्ये अनुष्काला बघून सगळ्यांना का आठवली दीपिका पदुकोण?

इटलीमध्ये लग्न झाल्यानंतर गुरूवारी विरूष्काचं दिल्लीमध्ये ग्रँड रिसेप्शन पार पडलं. 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Dec 22, 2017, 12:51 PM IST
रिसेप्शनमध्ये अनुष्काला बघून सगळ्यांना का आठवली दीपिका पदुकोण?  title=

मुंबई : इटलीमध्ये लग्न झाल्यानंतर गुरूवारी विरूष्काचं दिल्लीमध्ये ग्रँड रिसेप्शन पार पडलं. 

या नवीन लग्न झालेल्या दाम्पत्याला शुभेच्छा देण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आले होते. दिल्लीच्या एका फाइव स्टार हॉटेलमध्ये हे रिसेप्शन पार पडलं. यावेळी अनुष्काने डिझाइनर सब्यसाचीची लाल रंगाची सुंदर साडी परिधान केली होती. लाल साडी, लाल रंगाचा चूडा आणि सिंदूरने भरलेली मांग अशा स्वरूपात अनुष्का शर्मा भरपूर सुंदर दिसत होती. मात्र सोशल मीडियावर जसे अनुष्काचे फोटो व्हायरल व्हायला लागले अगदी तशी चाहत्यांना दीपिका पदुकोणची आठवण झाली. 

anushka sharma, deepika padukone

अनुष्काची साडी आणि तिच्या लूकची तुलही दीपिका पदुकोणने घातलेल्या साडीशी व्हायला लागली आहे. हल्लीच दीपिका पदुकोणने हेमा मालिनीच्या पुस्तक लाँचच्या वेळी अशाच रंगाची आणि अगदी सारखी अशी साडी परिधान केली होती. आणि त्यावेळी दीपिका पदुकोण खूप सुंदर दिसत असल्याची चर्चा देखील रंगली होती. 

anushka sharma, deepika padukone

गुरूवारी रिसेप्शनमध्ये अनुष्का बंगाली लूकमध्ये दिसली. रेड साडीमध्ये अनुष्काने सब्यसाची ब्राइडल ज्वेलरी कलेक्शनसोबत अनकट डायमंडचे चोकर आणि झुमके घातले होते. हा फोटो सब्यसाचीने इंस्टाग्रामवर शेअर केला असून म्हटलं आहे की, मला माहित आहे की या साडीच्या कॉपी पुढील काही महिन्यात संपूर्ण देशात दिसतील. मी फक्त एवढचं सांगते धन्यवाद, अनुष्का. 

anushka sharma, deepika padukone

असं हे पहिल्यांदा झालेलं नाही. अनुश्काच्या लूकची तुलना ही दीपिकाच्या लूकसोबत केली आहे. अनुष्काने लग्नात जे झुमके घातले होते ते झुमके या अगोदर दीपिकाकडे पाहिले आहेत. दीपिकाने जिओ मराठी फिल्मफेअर अवॉर्ड फंक्शनमध्ये घातले होते. त्यामुळे पुन्हा तिच्या झुमक्यांची तुलना झाली आहे.