कॉफी विथ करणच्या सहाव्या सिझनमध्ये विराट - अनुष्का भेटीला

लोकप्रिय दिग्दर्शक करण जोहनने बॉलिवूडला हिट सिनेमे दिले आहेत. 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Feb 7, 2018, 08:34 AM IST
कॉफी विथ करणच्या सहाव्या सिझनमध्ये विराट - अनुष्का भेटीला  title=

मुंबई : लोकप्रिय दिग्दर्शक करण जोहनने बॉलिवूडला हिट सिनेमे दिले आहेत. 

तसेच करणचा टीव्हीवर 'कॉफी विथ करण' हा सेलिब्रिटी टॉक शो देखील लोकप्रिय आहे. या शोमध्ये अनेक सेलिब्रिटी येऊन काही ना काही विवादास्पद वक्तव्य करतात आणि त्याची चर्चा होते. हा शो संपून दीड वर्ष झालं आहे. पण आता हा शो पुन्हा एकदा पुनरागमन करत आहेत. जरी करण अनेक सिनेमे आणि रिअॅलिटी शोला घेऊन बिझी असला तरीही तो कॉफी विथ करणचा नवा सिझन घेऊन येत आहे. 

कॉफी विथ करणमध्ये 'विरूष्का'

आता या नव्या सिझनमध्ये कुणाची मुलाखत पाहायला मिळणार यासाठी प्रेक्षक उत्सुक असताना. विरूष्काच्या चाहत्यांसाठी खूशखबर घेऊन करण येत आहे. कॉफी विथ करणच्या या सिझनमध्ये पहिलाच एपिसोड हा विराट - अनुष्कासोबत असणार आहे. 

विराट - अनुष्काच्या लग्नानंतरचा हा पहिला इंटरव्ह्यू असेल जिथे हे दोघं एकत्र येणार आहेत. आपल्याला विरूष्काची लव्हस्टोरी माहित आहेच पण पहिल्यांदा त्यांच्या तोंडून हा सगळा प्रवास ऐकणं खास असणार आहे. त्यामुळे आता विरूष्काचे चाहते या सिझनची आतुरतेने वाट पाहत आहेत.