'पॅडमॅन'च्या प्रमोशनसाठी अक्षय कुमारचे वेगवेगळे फंडे

९ फेब्रुवारीला अक्षय कुमारचा पॅडमॅन हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Updated: Feb 6, 2018, 10:40 PM IST
'पॅडमॅन'च्या प्रमोशनसाठी अक्षय कुमारचे वेगवेगळे फंडे title=

मुंबई : ९ फेब्रुवारीला अक्षय कुमारचा पॅडमॅन हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अक्षय वेगवेगळे फंडे वापरताना दिसतो आहे. अक्षयनं नुकताच अखाड्यातल्या पेहलवान आणि एका मुलासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा मुलगा शंकराच्या रुपामध्ये दिसत आहे.

चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अक्षय देशातील प्रसिद्ध बाईकरनी ग्रुपसोबतही दिसला होता. बाईकरनी बाईक चालवणाऱ्या महिलांचा समूह आहे. अक्षय कुमारनं त्याच्या चित्रपटाची पहिली स्क्रिनिंग सोमवारी गुजरातमध्ये केली. या स्क्रिनिंगला गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणीही उपस्थित होते.

पॅडमॅनचे दिग्दर्शक आर. बाल्की हेदेखील अक्षयबरोबर चित्रपटाचं प्रमोशन करतायत. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्नानं #PadManChallenge सुरु केलं आहे. यातून अक्षय आणि ट्विंकलनं बॉलीवूडमधल्या सेलिब्रिटींना पॅडसोबतचा फोटो शेअर करायला सांगितलं. आमिर खान, दीपिका पादुकोण, आलिया भट्ट, माधुरी दीक्षित यांनी यामध्ये सहभाग घेतला.

अक्षय कुमार आणि ट्विंकलच्या या चॅलेंजमध्ये वरुण धवन आणि अनुष्का शर्मानंही पॅड हातात घेऊन फोटो शेअर केला. अक्षय कुमारचाच चित्रपट गोल्डमधून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या मौनी रॉयनंही #PadManChallenge खास अंदाजात पूर्ण केलं.

अक्षय कुमारचा चित्रपट पॅडमॅन पहिला असा चित्रपट आहे जो एकाच दिवशी भारत आणि रशियामध्ये रिलीज होणार आहे. अक्षयनं या चित्रपटाचं रशियन पोस्टरही शेअर केलं आहे. 

असं सुरु आहे अक्षयच्या पॅडमॅनचं प्रमोशन