Anushka Sharma आज सर्वात जास्त खुष, तो फोटो सगळं काही सांगून जाणारा

अनुष्का शर्मा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

Updated: Jan 30, 2022, 03:27 PM IST
  Anushka Sharma आज सर्वात जास्त खुष, तो फोटो सगळं काही सांगून जाणारा title=

मुंबई : अनुष्का शर्मा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती दररोज काहीना काही नवं पोस्ट करताना दिसते. ती तिचे सुंदर फोटो शेअर करत असते, अनेकजण अनुष्काच्या स्माईलवर फिदा आहेत. आता असाच काहीसा फोटो अभिनेत्रीने शेअर केला आहे. ज्याचं कारण ही समोर आलं आहे.

अनुष्काच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तिच्या पुनरागमनाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. अनुष्का सुंदर फोटो पोस्ट करताच ते व्हायरल होतात.

अनुष्काने आज तिचे सन किसचे फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती नैसर्गिक वातावरणाचा आनंद लुटताना दिसत आहे. अनुष्काची ही स्टाईल तिच्या चाहत्यांना खूप आवडली आहे. ती सर्वात जास्त खुप असल्याचं या फोटोमध्ये दिसून येत आहे. तिचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

फोटो शेअर करताना अनुष्काने लिहिले – तो दिवस होता… हार्ट इमोजी. थ्रोबॅक... अनुष्काने हे जुने फोटो असल्याचे सांगत, तो दिवस आपण मिस करत असल्याचं म्हटलं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

 

फोटोमध्ये अनुष्का पार्कमध्ये बसून हसत हसत पोज देत आहे. तिने डेनिम्ससोबत पिंक कलरचा शर्ट घातला आहे. अनुष्का विराट आणि वामिकानंतर जर कोणत्या गोष्टीच्या प्रेमात असेल तर ते हे नैसर्गिक सौंदर्य आहे.  जिथे अनुष्काला वेळ घालवायला फार आवडते.