'माझ्या आयुष्यात तुम्ही दोघी... ', घटस्फोटानंतरही दोन्ही Ex Wives सोबत काय करतोय अनुराग कश्यप

घटस्फोटानंतर दोन्ही  Ex Wives सोबत अनुराग कश्यप करतोय तरी काय? फोटो व्हायरल  

Updated: Aug 17, 2022, 02:53 PM IST
'माझ्या आयुष्यात तुम्ही दोघी... ', घटस्फोटानंतरही दोन्ही  Ex Wives सोबत काय करतोय अनुराग कश्यप title=

मुंबई : कलाविश्वात सतत चर्चेत असणारी गोष्ट म्हणजे सेलिब्रिटींचे प्रेम प्रकरणं. बॉलिवूडमध्ये अनेक नाती दिर्घ काळ टिकली, तर काही मात्र कमी कालावधीत संपली. बॉलिवूडचा प्रसिद्ध निर्माता आण दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक चर्चा रंगल्या. अनुरागने दोन लग्न केली. पण त्याची दोन्ही लग्न अपयशी ठरली. पण आता अनुरागने एक फोटो पोस्ट केला आहे, ज्यामुळे तो प्रचंड चर्चेत आला आहे. अनुरागने घटस्फोटानंतर दोन्ही पत्नीसोबत फोटो पोस्ट केला आहे. अनुरागसोबत त्याच्या दोन पहिल्या पत्नींचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

फोटो पोस्ट करत अनुरागने कॅप्शनमध्ये 'या दोघीही माझ्या आयुष्याच्या आधारस्तंभ आहेत.' असं लिहिलं आहे. अनुरागच्या पोस्टवर मुलीने देखील कमेंट केली आहे. वडीलांच्या फोटोवर कमेंट करताना आलिया कश्यपने ‘आयकॉनिक’ असं लिहिलं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अनुरागने 1997 साली आरती बजाजशी लग्न केलं होतं. 2009 मध्ये या दोघांनी घटस्फोट घेतला असून या दोघांनी एक मुलगी आहे. त्यांच्या मुलीचं नाव आलिया कश्यप असं आहे. तर कल्कि केकलाशी त्याने 2011 साली लग्न केलं होतं आणि 2015 साली दोघांनी घटस्फोट घेतला होता.

सध्या अनुराग आगामी 'दोबारा' सिनेमामुळे चर्चेत आहे. अनुराग कश्यपचं दिग्दर्शन आणि अभिनेत्री तापसी पन्नूची मुख्य भूमिका असलेला ‘दोबारा’ हा चित्रपट  १९ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.