Anupam Mittal Reply to SN Subrahmanyan: 'शार्क टॅंक इंडिया' च्या अनुपम मित्तलनं लार्सन एन्ड टुब्रो (L&T ) च्या चेअरमन एसएन सुब्रमण्यन यांच्यावर वक्तव्य केलं आहे. त्यांनी एसएन सुब्रमण्यन यांनी केलेल्या त्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. एसएन सुब्रमण्यन यांनी कर्मचाऱ्यांना विचारलं की ते घरी त्यांच्या पत्नीकडे किती वेळ एकटक पाहू शकतात? तर उत्तर देत अनुपम म्हणाला, 'पण सर, जर आपण पती-पत्नी एकमेकांकडे पाहणार नाही तर आपण जगातील सगळ्यात जास्त लोकसंख्या असणारा देश कसा होणार?'
पोस्टवर प्रतिक्रिया देत एक व्यक्ती म्हणाला, 'तुझ्याकडून अशा उत्तराची अपेक्षा नव्हती.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'सर, तुमचा ह्यूमर आणि शार्क टॅंकच्या टीआरपी प्रत्येक जाणाऱ्या दिवसाप्रमाणे कमी होते.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'हाहाहा, हे खूप भारी उत्तर होतं. मला फार आवडलं.'
But sir, if husband and wife don’t look at each other, how will we remain the most populous country in the world
— Anupam Mittal (@AnupamMittal) January 11, 2025
एसएन सुब्रमण्यन यांनी नुकतंच घरी राहण्याच्या गरजेवर प्रश्न उपस्थित करत म्हटलं की 'जर त्यांच्या कर्मचाऱ्यांनी रविवारी देखील काम केलं असतं तर त्यांना खूप आनंद झाला असता. त्यानंतर सुब्रमण्यन यांनी हे देखील विचारलं की तुम्ही घरी राहून तुमच्या पत्नीला किती वेळ एकटक पाहू शकता?'
एसएन सुब्रमण्यान यांच्यानंतर L&Tनं एक स्टेटमेंट जारी करत अध्यक्षाच्या कमेंटवर उत्तर दिलं आहे. दीपिका पदुकोणनं देखील या वक्तव्यांना खोटं ठरवलं आहे आणि इन्स्टाग्रामवर मेंटल हेल्थ संबंधीत एक स्क्रीनशॉट शेअर करत कॅप्शन लिहिलं की 'आणि या लोकांनी या सगळ्याला आणखी खराब केलं.'
कर्मचाऱ्यांशी बोलत असताना सुब्रमण्यन यांनी आठवड्याला 90 तास काम करण्याच्या वक्तव्यावर सांगितलं की 'त्यांना दु:ख होतं की ते रविवारी कर्मचाऱ्यांना कामावर बोलावू शकत नाही. तुम्ही घरी बसून काय करता? तुम्ही तुमच्या पत्नीकडे कितीवेळ एकटक पाहू शकता? पती त्यांच्या पत्नीला कितीवेळ एकटक पाहू शकता? ऑफिसमध्ये जा आणि काम करा.'
हेही वाचा : 'तू पैशांची चिंता करु नको, फक्त...'; 'Roadies 20'च्या स्पर्धकाला प्रिंस नरूला, एल्विश यादव असं का म्हणाले?
अनुपमविषयी बोलायचं झालं तर तो ऑनलाइन शादीच्या पोर्टल Shaadi.com चे संस्थापक आणि सीईओ आहे. त्याशिवाय को 'शार्क टॅंक इंडिया'च्या एक, दोन आणि तिसऱ्या सीझनचा एक भाग झाला आहे.