‘ओ पोची, ओ कोकी…’ शाहरुखच्या ऑनस्क्रीन वडिलांनी पाहिला जवान, DDLJ स्टाईलमध्ये दिला रिव्ह्यू

Anupam Kher on Shah Rukh Khan : सध्या शाहरूखचा 'जवान' हा चित्रपट चांगलाच लोकप्रिय होतो आहे. यावेळी चर्चा आहे ती म्हणजे अनुपम खेर यांनी दिलेल्या जवानवरील रिव्ह्यूची. यावेळी त्यांची चांगलीच चर्चा रंगेलली आहे. तुम्ही पाहिलात त्यांचा रिव्ह्यू हा नक्की काय आहे? 

गायत्री हसबनीस | Updated: Sep 12, 2023, 12:30 PM IST
‘ओ पोची, ओ कोकी…’ शाहरुखच्या ऑनस्क्रीन वडिलांनी पाहिला जवान, DDLJ स्टाईलमध्ये दिला रिव्ह्यू title=
anupam kher gives review of jawan on twitter netizens reacts

Anupam Kher on Shah Rukh Khan : शाहरूख खानच्या 'जवान' या चित्रपटानं वेगळीच उंची गाठली आहे. फारच कमी दिवसात या चित्रपटानं मोठी कामगिरी केली आहे. बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटानं सर्व रेकॉर्ड्स ब्रेक केले आहेत. या चित्रपटाची सर्वत्र चर्चा होताना दिसते आहे. यातच आता अनुपम खेर यांनी देखील सोशल मीडियावरून शाहरूखचा फोटो शेअर करत त्याच्या 'जवान' या चित्रपटाचा रिव्ह्यू दिला आहे. सध्या त्यांनी दिलेला हा रिव्ह्यू वाचून सर्वच जण अवाक झाले आहे. बॉलिवूडवरही अनेकदा अनुपम खेर ही टीका करताना दिसले आहेत. परंतु यावेळी शाहरूखवरील प्रेमामुळे चाहत्यांचे मतपरिवर्तन झाले आहे. यावेळी त्यांनी शाहरूखचा जवान हा चित्रपट पाहून डीडीएलजे स्टाईल म्हणजेच दिलवाले दुल्हनिया स्टाईल शुभेच्छा दिल्या आहेत. या चित्रपटात अनुपम खेर यांनी शाहरूखच्या वडिलांची भुमिका निभावली होती. यावेळी राज मल्होत्राच्या वडिलांनी शाहरूखला हटके स्टाईल शुभेच्छा दिल्या आहेत. 

त्यामुळे त्यांची जोरात चर्चा रंगलेली आहे. 7 सप्टेंबर रोजी 'जवान' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यानंतर या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई केली आहे. बॉलिवूडमधील विविध मोठमोठे कलाकार हे सोशल मीडियावरून शाहरूख खानला शुभेच्छा देताना दिसत आहेत. यावेळी अनुपम खेरनं दिलेल्या रिव्ह्यूनं सर्वांचेच लक्ष वेधले आहे.

आपल्या ट्विटर हॅण्डलवरून त्यांनी एक ट्विट व्हायरल केले आहे ज्यात ते लिहितात की, '''प्रिय शाहरूख, आता आताच मी अमृतसर येथील प्रेक्षकांसोबत तुमची चित्रपट 'जवान' पाहिला. खूप मज्जा आली आणि आनंद झाला. अॅक्शन, चित्रपटाची लांबी, तुमची अदाकारी आणि परफॉर्मन्स खूपच उमदा आहे. स्क्रीनवर तुम्हाला पाहून एका दोन ठिकाणी तर शिट्ट्याही मारल्या. चित्रपटातील सर्वच पात्रं ही फारच मस्त आहे. सर्वच टीमचे खूप खूप अभिनंदन आणि खासकरून दिग्दर्शक अटली यांचेही. मी जेव्हा मुंबईला येईन तेव्हा नक्कीच तुम्हाला मिठी मारेन. ओ पोची, ओ कोकी, ओ पोपी, ओ लोला!!!'

हेही वाचा : 'नॅनी आपल्या टेबलावर बसून का जेवत नाही?' जेव्हा करीनाला मुलांनी विचारले, अशी होती अभिनेत्रीची प्रतिक्रिया

'दिलवाले दुल्हनिया ले जाएगें' हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करतो आहे. त्यातून राज मल्होत्रा म्हणेजच शाहरूख खान याच्या वडिलांनी भुमिका अनुपम खेर यांनी केली होती. आज त्यांनी 28 वर्षांनंतर आपल्या ऑनस्क्रिन मुलाला जवानच्या शुभेच्छा दिल्या आहेत.