कथित MMSनंतर अंजली अरोराचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल; पुस्तक वाचण्याच्या बहाण्याने 'या' अभिनेत्यासोबत...

या व्हिडिओसाठी माफ कर असंही अंजली अरोराने म्हटलंय

Updated: Sep 20, 2022, 04:47 PM IST
कथित MMSनंतर अंजली अरोराचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल; पुस्तक वाचण्याच्या बहाण्याने 'या' अभिनेत्यासोबत... title=

Anjali Arora Video : 'कच्चा बदाम' गाण्यावर डान्स करून रातोरात प्रसिद्धीच्या झोतात आलेली अंजली अरोराला (anjali arora) कंगना रणौतच्या (kangana ranaut) 'लॉकअप' शोने (lock upp) घरोघरी खास ओळख मिळवून दिलीय. काही दिवसांपूर्वी, कथित अश्लील एमएमएस व्हायरल (MMS viral) झाल्यानंतर अंजली अरोरा (anjali arora) खूप चर्चेत होती. त्यानंतर अंजलीने स्वत: या प्रकरणावर मौन सोडलं आणि त्या व्हिडिओमध्ये दिसणारी ती मुलगी नसल्याचे सांगितले. कथित एमएमएस व्हिडिओ व्हायरल (MMS viral) झाल्यानंतर अंजली अरोराचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (social media) होत आहे. या व्हिडिओमध्ये ती एका अभिनेत्यावर रोमान्स करताना दिसत आहे.

मात्र या व्हिडीओवरुन अंजली अरोरा मोठ्या (anjali arora) प्रमाणात ट्रोल होत आहे. अंजली अरोराने हा ब्लुपर व्हिडिओ (blooper video) इंस्टाग्रामवर (Instagram) शेअर केला आहे ज्यामध्ये ती मॉडेल उमर रियाझसोबत (Umar Riaz) दिसत आहे. या ब्लुपर व्हिडिओमध्ये अंजली आणि उमर एक रोमँटिक सीन (romantic scene) शूट करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ शेअर करत अंजलीने हाहाहाहा... या व्हिडिओसाठी उमर माफ कर, असं कॅप्शन दिले आहे.

व्हिडिओमध्ये अंजली अरोरा (anjali arora) हातात जाड पुस्तक घेऊन बेडवर बसलेली दिसत आहे. त्याचवेळी उमर (Umar Riaz) तिच्या अगदी जवळ बसलेला दिसतो. अंजलीच्या हातात मोराची पिसे आहेत जी ती उमरच्या चेहऱ्यावर प्रेमाने फिरवताच त्याला शिंक येते. यावरुन दोघेही हसायला लागतात. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले आहेत.

अंजली अरोराच्या या पोस्टवर तिला प्रचंड ट्रोल करण्यात आलं आहे. एका युजरने कमेंटमध्ये पुढील MMS त्याच्यासोबत येईल अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्या एका युजरने उमर रियाजकडे यापेक्षा चांगल्या मुली आहेत. अशा अनेक कमेंट्स करून लोकांनी अंजलीला ट्रोल केलंय. 

दरम्यान, याबाबत अंजली अरोरानं कोणतंही प्रत्युत्तर दिलेलं नाही. सोशल मीडियावर प्रत्येक नवीन पोस्टवर अंजलीलला ट्रोल केलं जाते. नुकतेच नवीन गाणे लॉन्च केल्यानंतरही अंजलीला ट्रोल करण्यात आले होते.