गरब्याला जाताना कसं तयार व्हायचं? Ankita Lokhande चा लूक पाहिल्यानंतर मिळेल उत्तर

गरब्याला जाण्यासाठी  Ankita Lokhande चा परफेक्ट लूक, पाहा अभिनेत्रीचा खास व्हिडीओ   

Updated: Sep 20, 2022, 03:28 PM IST
गरब्याला जाताना कसं तयार व्हायचं? Ankita Lokhande चा लूक पाहिल्यानंतर मिळेल उत्तर title=

मुंबई : नवरात्रीचा सण म्हणजे गुजरातचा गरबा आणि पश्चिम बंगालची दुर्गापूजा यांचा संगम असतो. गरबा-दांडियाच्या ठेक्यावर तर तरुणाईची पावलं थिरकतात त्यामुळे दुर्गापूजेपेक्षाही गरबा-दांडियाला प्रचंड महत्त्व आले आहे. तरुणाई तर जणू या उत्सवाची आतुरतेने वाट बघत असते. तरुणाईसाठी तर उत्सव हे जणू जल्लोष आणि त्यांचा उत्साहच आहे. आता सर्वत्र नवरात्रीचा तयारी सुरु झाली आहे. 

नवरात्रीचा सण म्हणजे प्रत्येकाला गब्याचं आकर्षण असतं आणि गरबा म्हटलं तर कसं तयार व्हायचं असा प्रश्न प्रत्येक मुलीला पडतो. त्यामुळे नवरात्रीच्या आधीच अनेक मुली शॉपिंगसाठी जातात, तर काही मुली ऑनलाईन शॉपिंग करतात.  तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सध्या अभिनेत्री अंकिता लोखंडेचा एक लूक तुफान व्हायरल आहे. अंकिताने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने गरब्याला साजेसा असा लूक केला आहे. त्यामुळे अंकिताचा हा लूक तुम्ही गरब्याला कॅरी करू शकता. 

तरुणींसाठी दांडियासाठीचा पेहराव म्हणजे मस्त घेरदार घागराचोली आणि त्यावर पल्लेदार चुनरी. या घागराचोलीवर बांधणी पिट्रचे, अबला वर्कचे, कशिदा वर्कचे भरगच्च भरतकाम केलेले असते. आजकाल तर बॅकलेस चोलीची तर जास्त फॅशन आहे.