...त्यानंतर अंकिताने सुशांतचे भिंतीवरील फोटो उतरवले

अंकिता-सुशांतचं 2016मध्ये ब्रेकअप झालं. पण त्याच्या सोबत असलेल्या अठवणींबद्दल अंकिता म्हणाली...

Updated: Mar 23, 2021, 09:33 AM IST
...त्यानंतर अंकिताने सुशांतचे भिंतीवरील फोटो उतरवले title=

मुंबई : ऐकेकाळी दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि अभिनेत्री अंकिता लोखंडे यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा सर्वदूर पसरल्या होत्या. पण त्यांचं  हे नातं फार काळ काही टिकलं नाही. नातं तुटलं असलं तरी अंकिताने काही दिवस सुशांतचे फोटो भिंतीवरून उतरवले नव्हते. अनेकांनी तिला याबद्दल  अनेक प्रश्न देखील विचारले, यावर तिचं उत्तर होतं परिस्थितीमधून पळवाट काढायला मला आवडत नाही. अंकिता यांसंबंधी खुलासा एक मुलाखतीत केला. 

बॉलिवूड बबलने घेतलेल्या  मुलाखतीत अंकिता म्हणाली, 'सुशांत आणि माझ्या ब्रेकअप नंतर जेव्हा माझ्या घरी कोणी यायचं तेव्हा मला एकच  प्रश्न विचारायचे हे फोटो का अजून ठेवले आहेत?' यावर अंकिता म्हणाली, मला थोडा वेळ द्या. मी त्यांच्यासोबत जवळपास 2 वर्ष राहिली.  या सर्व फोटोंसोबत मी माझं आयुष्य जगली आहे. 

पुढे अंकिता म्हणाली, 'मी परिस्थितीतून पळून जाईल असं नाही. मी तेव्हा प्रत्येक दिवसांचा सामना केला. असा देखील विचार केला, जेव्हा सुशांत माझ्या समोर येईल, तेव्हा मी त्या सामोरं जाईल.. अखेर एक दिवस आसा आला आणि मला वाटलं की आता वेळ आली आहे. त्या जागी कधीतरी नवी व्यक्ती येईल...' त्यानंतर  अंकिताने सुशांतचे फोटो भिंतीवरून उतरवले. 

सुशांतसोबत ब्रेकअप झाल्यानंतर माझ्या आयुष्या विकी आला. आज मी विकीसोबत खूश आहे.  विकी जैन अंकिताचा बॉयफ्रेंड आहे. विकी आणि अंकिता यांना अनेकदा एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे. तर महत्त्वाचं म्हणजे विकी-अंकिता लवकरच लग्न देखील करणार आहे.