कोट्यवधींचा मालक आहे Ankita Lokhande चा पती; संपत्ती ऐकून थक्क व्हाल

 टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री अंकिता लोखंडेने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. 

Updated: Jun 17, 2022, 06:39 PM IST
कोट्यवधींचा मालक आहे Ankita Lokhande चा पती; संपत्ती ऐकून थक्क व्हाल   title=

मुंबई : टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री अंकिता लोखंडेने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. याशिवाय तिने 'बागी 3' आणि 'मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी' सारख्या बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केलं आहे. अंकिताचं नाव आणि काम सर्वांनाच माहिती आहे. पण तिचा पती विकी जैनबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. विकी एक यशस्वी बिझनेसमन आहे ज्याची संपत्ती करोडोंमध्ये आहे.

विकी एका बहुराष्ट्रीय कंपनीचा संचालक आहे
 विकी जैन हा 'महावीर इन्सपायर ग्रुप' मल्टीनॅशनल कंपनीचा मालक आहे. विकी हा रायपूरचा रहिवासी असून त्याचे आई-वडील दोघंही व्यवसायात आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, विकीची PIT कोल नावाची कोळसा कंपनी आहे. ज्याची किंमत 100 कोटींहून अधिक आहे. याशिवाय, त्याला क्रिकेटमध्ये खूप रस आहे आणि तो BCL मध्ये खेळणाऱ्या 'मुंबई टायगर्स' या क्रिकेट संघाचा मालक आहे.

मुंबईत आलिशान घर
अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांनी 2019 मध्ये मुंबईत 8 BHK आलिशान आणि सुंदर घर विकत घेतलं. अंकिता या घरात विकीसोबत राहते. याशिवाय अंकिताचा स्वतःचा 3BHK फ्लॅट देखील आहे. त्याचबरोबर विकीच्या गावी त्याचं एक आलिशान घर आहे. लग्नानंतर अंकिता तिथे गेली होती, ज्याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले होते.

विकी जैन एवढ्या संपत्तीचा मालक आहे
मीडिया रिपोर्ट्सनुसार, विकी जैनची एकूण संपत्ती 40 कोटी आहे. त्याने वेगवेगळ्या गोष्टींमध्ये पैसे गुंतवले आहेत. याशिवाय त्याच्याकडे मुंबईत 8BHK चं आलिशान घर आहे. ज्याची किंमत काही कोटी आहे. यासोबतच त्याला महागड्या गाड्यांचाही शॉक आहे. त्याच्याकडे लँड क्रूझर, मर्सिडीज बेंझ सारख्या आलिशान गाड्या आहेत. त्याचबरोबर अंकिताकडे Jaguar XF आणि Porsche 718 देखील आहे.