'भाभीजी घर पर हैं'च्या अनिता भाभीचं बोल्ड प्रेग्नन्सी फोटोशूट; ट्रोलर्स म्हणाले...

anita bhabi pregnancy photoshoot: सध्या अनेक इन्टाग्रामवर प्रेग्नंन्सी फोटोशूटचे वावडे आहे. त्यामुळे त्याचीच अनेकदा चर्चा होताना दिसते. 'आता भाभीजी घर पर हैं' या मालिकेतील अनिता भाभी यांनी सोशल मीडियावर आपलं बोल्ड फोटोशूट शेअर केलं आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: Jun 10, 2023, 04:58 PM IST
 'भाभीजी घर पर हैं'च्या अनिता भाभीचं बोल्ड प्रेग्नन्सी फोटोशूट; ट्रोलर्स म्हणाले...  title=
(Photo : Vidhisha Srivastava | Instagram)

anita bhabi pregnancy photoshoot: सध्या प्रेग्नंन्सी फोटोशूटमुळे कलाकार हे चांगलेच चर्चेत आलेले असतात. 'भाभीजी घर पर हैं' या मालिकेतील अनिता भाभी म्हणजेच अभिनेत्री विदिशा श्रीवास्तव हिनं आपलं बोल्ड प्रेग्नंन्सी फोटोशूट केलं आहे. त्यातून ती चांगलीच चर्चेत आली आहे. परंतु तिच्या या बोल्ड फोटोशूटवर मात्र चाहते नाराज झाले आहेत. तिला विविध प्रकारे ट्रोल करण्यात आलं आहे. आज अभिनेत्री आपलं मदरहूड एन्जॉय करताना दिसतात आणि सोशल मीडियावर आपलं मातृत्व सेलिब्रेटही करताना दिसतात. त्यांच्या बेबी बंपच्या फोटोशूटवर त्यांचे चाहते अनेक कमेंट्सही करताना दिसतात. त्यामुळे त्यांची बरीच चर्चा रंगलेली दिसते.

सध्या अनिता भाभी म्हणजेच अभिनेत्री विदिशा श्रीवास्तव हिचे प्रेग्नंन्सी फोटोशूट पाहून नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. यावेळी विदिशा यांनी हटके फोटोशूट केलं आहे. यावेळी तिनं आपल्या फोटोशूट मधून बेबी बंप फ्लॉन्ट केलं आहे. त्यामुळे तिची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. परंतु यावेळी तिला काही ट्रोलर्सनी ट्रोलही केलं आहे. तिनं वेगवेगळ्या पोझेसमध्ये आणि वेगवेगळ्या ड्रेसमध्ये हे फोटोशूट केलं आहे. त्यामुळे तिच्या या फोटोशूटला तिच्या चाहत्यांकडून चांगला प्रतिसाद मिळतो आहे. अशातच तिच्या फोटोशूटकडे पाहून काहींनी मात्र नापसंती दर्शवली आहे. नक्की हे ट्रोलर्स काय म्हणाले?

यामध्ये काहींनी लिहिलंय की, हे नुसता तमाशा आहे. तर दुसऱ्या एकानं लिहिलंय की, वेडेपणा करण्यासाठी काही वय लागत नाही. तर एका युझरनं लिहिलंय की, हे सगळं चांगल सुरू नाहीये. काहींनी म्हटलंय की आम्हाला हे असलं फोटोशूट अजिबातच आवडतं नाही. तर काहींनी म्हटलंय की हे काय सतत ही मर्टिनिटी फोटोशूट संस्कृती का वाढते आहे? तर अशाच एका युझरनं लिहिलंय की, अशाप्रकारे प्रेग्नंन्सी फोटोशूट करून तुम्ही काय दाखवण्याचा प्रयत्न करता? तर काहींनी म्हटलंय की ही संस्कृती प्रचंड घातक आहे आपल्या भविष्यासाठी. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सध्या तिचं हे फोटोशूट तूफान व्हायरल होत आहे. विदिशा आपल्या अनेक फोटोशूटसाठी ओळखली जाते. ती सोशल मीडियावरही चांगलीच एक्टिव आहे. त्यामुळे ती सतत चर्चेत आहे. भाभीजी घर पर हैं या मालिकेतून ती घराघरात पोहचली. सोशल मीडियावरही तिचे लाखो चाहते आहेत. तुम्ही हे फोटोशूट पाहिलंत का? सध्या या फोटोशूटची चर्चा आहे. काहींनी तिला ट्रोल केलं असलं तरीसुद्धा अनेकांनी तिच्या या फोटोशूटची स्तुतीही केली आहे.