Animal सिनेमातून काढलेला सीन होतोय व्हायरल, 'नशेच्या धुंदीत प्रायव्हेट जेटमध्ये....'

Animal Deleted Scene Video: अ‍ॅनिमल सिनेमातून हटवण्यात आलेला एक सीन सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे. 

Pravin Dabholkar | Updated: Dec 4, 2023, 04:56 PM IST
Animal सिनेमातून काढलेला सीन होतोय व्हायरल, 'नशेच्या धुंदीत प्रायव्हेट जेटमध्ये....'  title=

Animal Deleted Scene Video: रणबीर कपूर आणि रश्मिका मंदान्ना स्टारर चित्रपट अ‍ॅनिमल बॉक्स ऑफिसवर सध्या चांगलीच कमाई करत आहे. संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित या चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम आणि दाद मिळत आहे. यातील रणबीर कपूरच्या भूमिकेचे खूप कौतूक केले जात आहे. एव्हाना सोशल मीडियात यातील काही सीन्सदेखील व्हायरल होऊ लागले आहेत. यासोबतच सिनेमातून डिलीट करण्यात आलेले सिन्सदेखील समोर आले आहेत. 

अ‍ॅनिमल सिनेमातून हटवण्यात आलेला एक सीन सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे. हा सीन सुरुवातीला अर्जन व्हॅलीच्या म्युझिक व्हिडिओमध्ये दाखवण्यात आला होता. मात्र तो नंतर सिनेमात दिसला नाही. याचा अर्थ तो सिनेमातून काढून टाकण्यात आल्याचे म्हटले जात आहे. 

'अ‍ॅनिमल'मधील हटवलेला सीन समोर 

'अ‍ॅनिमल'  प्रेक्षकांना खूप आवडला आहे. केवळ चित्रपटच नव्हे तर त्यातील गाणीही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. आता निर्मात्यांनी चित्रपटातून एक सीन काढून टाकला आहे. जो अर्जन व्हॅली गाण्याच्या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आला होता. म्युझिक व्हिडिओमध्ये 'अ‍ॅनिमल'चा एक सीन दाखवण्यात आला होता. ज्यामध्ये जखमी रणबीर कपूर एका खासगी जेटमध्ये दारूची बाटली धरलेला दिसत होता.

त्या दृश्यात अभिनेत्यावर हल्ला झाला असून त्याच्या डोळ्यांना दुखापत झाल्याचेही दाखवण्यात आले आहे. रणबीर दारूची बाटली हातात धरून त्याच्या चुलत भावांसोबत एका प्रायव्हेट जेटवर बॉडीगार्ड म्हणून उभा होता. त्यानंतर रणबीर पायलटला बाजूला ढकलून ड्रायव्हरच्या सीटवर बसलेला दिसतो. गाण्याच्या व्हिडिओमध्ये हे दृश्य दाखवण्यात आले होते. मात्र नंतर ते काढून टाकण्यात आले आणि आता नेटकऱ्यांकडून हा सीन सोशल मीडियावर शेअर केला जात आहे.

'अ‍ॅनिमल'ची कमाई 

सुरुवातीच्या दिवसापासून 'अ‍ॅनिमल' चांगली कमाई करत आहे. या रणबीर कपूर स्टारर चित्रपटाने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 130.07 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. हिंदी भाषेत या चित्रपटाने पहिल्या दिवशी 54.75 कोटी आणि दुसऱ्या दिवशी 58.37 कोटींचा व्यवसाय केला. त्याचबरोबर जगभरात या चित्रपटाने 236 कोटींची कमाई केली आहे. एवढेच नव्हे तर दक्षिणेतही या चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे.