जेव्हा दिया मिर्झाला झाडाच्या मागे बदलावे लागले कपडे, अभिनेत्रीने सांगितला 'तो' किस्सा!

अभिनेत्री दिया मिर्झा नेहमीच कोणत्याना कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत असते. अभिनेत्री तिच्या स्पष्टवक्तपणामुळे देखील ओळखली जाते. नुकतंच दिया मिर्झाने चित्रपटसृष्टीतील जेंडर भेदभावांवर बोलती झाली आहे.

Updated: Dec 4, 2023, 04:46 PM IST
 जेव्हा दिया मिर्झाला झाडाच्या मागे बदलावे लागले कपडे, अभिनेत्रीने सांगितला 'तो' किस्सा! title=

मुंबई : अभिनेत्री दिया मिर्झा नेहमीच कोणत्याना कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत असते. अभिनेत्री तिच्या स्पष्टवक्तपणामुळे देखील ओळखली जाते. नुकतंच दिया मिर्झाने चित्रपटसृष्टीतील जेंडर भेदभावांवर बोलती झाली आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत बोलताना दिया या विषयी बोलताना म्हणाली की, जेव्हा मी सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं तेव्हा सिनेसृष्टीत कलाकारांची संख्या जास्त होती. त्यामुळे भेदभाव मोठ्या प्रमाणात व्हायचे. आऊटडोर शूटिंगदरम्यान अभिनेत्रींना व्हॅनिटीची  सोयदेखील आम्हा कलाकारांना दिली जायची नाही. झाडाच्या मागे कपडे बदलावे लागायचे असंही अभिनेत्री यावेळी म्हणाली. आम्ही कपडे बदलताना आमचे सहकलाकार ज्युनियर आर्टिस्ट साडी आणि बेडशीटने आम्हाला कव्हर करायचे तेव्हा आमच्यासाठी स्वतंत्र बाथरुमही नव्हते.

बीबीसी हिंदीला दिलेल्या मुलाखतीत दिया मिर्झा म्हणाली की, जेव्हा मी सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं तेव्हा सेटवर खूप कमी महिला काम करायच्या. यावेळी प्रत्येक वळणावर भेदभाव हा पाहायला मिळायचा. आम्हाला प्रत्येकवेळी वेगळंच ट्रिट केलं जायचं.
 
पुरुष एक्टर्सच्या व्हॅनिटी व्हॅनच्या तुलनेत आमची व्हॅनची साईज खूपच छोटी होती. जेव्हा आम्ही गाण्याचं शूटिंग करायला आऊटडोर जायचो तेव्हा कपडे बदल्यासाठीही सोय नव्हती. बाथरुमची सोयदेखील नसायची. एवढंच नव्हेतर दियाने हे देखील सांगितलं की, जर एखादी एक्ट्रेस सेटवर लेट आली तर त्या एक्ट्रेसला अनप्रोफेशनलचा टॅग मिळायचा. मात्र पुरुष एक्टर्सच्या हे सगळं लागू नव्हतं. त्यांच्या उशिरा येण्याने कोणालाच काहीच प्रॉब्लेम नसायचा. 

आशा पारेख यांनाही जावं लागलं या सगळ्यातून
ANI ला दिलेल्या एका मुलाखतीत आशा पारेख यांनी या विषयावर भाष्य केलं होतं. याविषयी बोलताना आशा यांनी सांगितलं की, - त्यावेळी आम्ही शूटिंगसाठी जायचो तेव्हा स्टुडिओमध्ये बाथरूम नसायचे आणि आम्ही बाथरूमलाही जायचो नाही.  दिवसभर आम्ही तिथे तसेच असायचो. सुदैवाने, मला किडनीशी संबंधित कोणतीही समस्या नव्हती. अनेकदा झाडाच्या मागे कपडेही बदलायला लागायचे.

2000 मध्ये दियाने मिस इंडिया एशिया पॅसिफिक हा किताब पटकावला होता. 2001 मध्ये 'रहना है तेरे दिल में' या सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या सिनेमानंतर दियाने कधी मागे वळून पाहिलंच नाही. यानंतर तिने जवळ-जवळ 33 सिनेमांत काम केलं. 

15 फेब्रुवारी 2021  मध्ये  वैभव रेखीसोबत दियाने लग्न केलं. तिच्या या लग्नाला तिच्या जवळची माणसं उपस्थित होते. दिया आणि वैभव या दोघांचही हे दुसरं लग्न आहे. याआधी २०१४ मध्ये दियाने बिझनेस पार्टनर साहिल संघासोबत लग्न केलं होतं. यानंतर या दोघांनी 2019 मध्ये घटस्फोट घेतला.