शिवीगाळ प्रकरणी सलमानच्या अडचणीत मोठी वाढ, आता नशिबात काय?

... त्याची जीभ घसरली, कोणीही विचार केलं नसेल अखेर तेच घडलं,  सलमानच्या अडचणीत मोठी वाढ  

Updated: Mar 23, 2022, 12:33 PM IST
शिवीगाळ प्रकरणी सलमानच्या अडचणीत मोठी वाढ, आता नशिबात काय? title=

मुंबई : अभिनेता सलमान खानच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी काळविट प्रकरणात मोठा दिलासा मिळाल्यानंतर अंधेरी मजिस्ट्रेट कोर्टाने सलमानला पुन्हा समन्स बजावला आहे. जवळपास तीन वर्ष जुन्या सायकल वादाप्रकरणी सलमानला समन्स पाठवण्यात आला आहे. समन्स जारी करत सलमानला अंधेरीतील मेट्रोपोलिटन कोर्टात हजेरी लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

या प्रकरणी सलमानला 5 एप्रिल रोजी कोर्टात हजर राहण्यासाठी सांगण्यात आलं आहे. फक्त सलमान नाही त्याचा बॉडीगार्ड नवाज इकबाल शेखला देखील कोर्टात हजर राहायचं आहे. त्यामुळे या प्रकरणी सलमानला दिलासा मिळतो की, त्याच्या अडचणीत वाढ होईल.. हे 5 एप्रिल रोजी समोर येईल. 

सलमान संबंधित हे संपूर्ण प्रकरण 3 वर्षे जुनं आहे. त्यावेळी अशोक पांडे नावाच्या व्यक्तीने सलमान खान मुंबईच्या रस्त्यावर सायकल चालवत असतानाचा व्हिडीओ बनवण्याचा प्रयत्न केला. 

सलमानच्या बॉडीगार्डची परवानगी घेत अशोक पांडे यांनी व्हिडीओ बनवण्यास सुरूवात केली. पण तरी देखील सलमान आणि त्याच्या बॉडीगार्ड असभ्य वर्तन केल्याचा आरोप पांडे यांनी केला. एवढंच नाही तर पांडे यांचा मोबाईल हिसकावून त्यांना शिवीगाळ  देखील केली. 

त्यानंतर अशोक पांडे यांनी अंधेरीतील डीएन नगर पोलिस ठाण्यात सलमान खानविरोधात तक्रार दाखल केली होती. ही घटना 24 एप्रिल 2019 ची असल्याचं सांगण्यात येत आहे.